शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

माचणूरच्या सरपंचाचे धाडस; भीमा नदी पात्रात बुडणाºया चौघांना मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:08 IST

भीमा नदीत बुडणाºया चौघांना जीवदान; माचणूरचे सरपंच सुनील पाटलांनी केलं धाडस

ठळक मुद्देमाचणूरचे माजी सरपंच सुनील पाटील हे मित्रासमवेत मासे पाहण्यासाठी जात होतेसुनील पाटील हे लगेच पाण्यात उतरून त्या चौघा तरुणांना एकेक करीत मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलेचौघे कडेला पोहत होते तर अन्य चौघे मध्यभागी प्रवाहात गेले़ पाण्याच्या प्रवाहात त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडत होते़

मंगळवेढा : तालुक्यातील माजी सरपंच सुनील पाटील हे मित्रासोबत भीमा नदीत मासे आलेत का हे पाहण्यासाठी गेले़ ते दोघे नदीच्या माचणूरकडील बाजूने जात असताना मेलो मेलो.. वाचवा वाचवा.. असे शब्द कानी पडले़ चार तरूण दुथडी भरलेल्या नदीपात्राच्या प्रवाहात बुडत असल्याचे त्यांना दिसले़ त्यांनी कशाचाही विचार न करता एकेक करीत त्या चौघांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले़रविवारी दुपारी चार दुचाकीवरून आठ तरूण पोहण्यासाठी अर्धनारीजवळील बंधाºयाजवळ गेले़ त्यांनी भीमा नदीच्या तीरावर दुचाकी लावून पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले़ दरम्यान, चौघे कडेला पोहत होते तर अन्य चौघे मध्यभागी प्रवाहात गेले़ पाण्याच्या प्रवाहात त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडत होते़ तेव्हा मेलो मेलो.. वाचवा वाचवा.. असे ओरडू लागले.

दरम्यान, माचणूरचे माजी सरपंच सुनील पाटील हे मित्रासमवेत मासे पाहण्यासाठी जात होते़ त्यांना त्या तरुणांचा आवाज कानी पडला़ सुनील पाटील हे लगेच पाण्यात उतरून त्या चौघा तरुणांना एकेक करीत मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले़ स्वत:च्या जीवाची तमा न बाळगता पोहत जाऊन पाण्याच्या प्रवाहातून त्या चौघांना बाहेर काढले़ त्यांच्या पोटातून पाणी काढले़ ते शुद्धीवर आल्यानंतर माझ्या पाया पडू लागले, पण मी त्यांना असे करू नका, जीव वाचला हेच महत्त्वाचे आहे, असे सांगून शांत केले. त्यानंतर वेगवान पाण्याच्या प्रवाहात जास्त पोहल्यामुळे प्रचंड थकवा जाणवत होता़ हात आणि पाय दुखत असल्याने त्या ठिकाणी न थांबता मी थेट घरी येऊन झोपी गेलो ते सोमवारी सकाळी ८ वाजताच उठलो. ते तरुण कुठले होते, कशासाठी आले होते, याची काहीही माहिती मी जाणून घेतली नाही. केवळ त्यांचा जीव वाचविणे महत्त्वाचे होते, ते काम मी केल्याचे सुनील पाटील यांनी सांगितले.

आतापर्यंत १०० जणांना वाचविले- गावच्या शेजारीच नदी असल्याने पाचवीला असताना पोहायला शिकलो़ त्यानंतर पाण्यात कोण बुडत असल्याचे दिसताच त्यांचा जीव वाचविण्याचे काम केले़ आतापर्यंत सुमारे १०० पेक्षा जास्त व्यक्तींना वाचविले आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीriverनदी