करमाळ्यात कोरोना योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:12 IST2021-01-08T05:12:08+5:302021-01-08T05:12:08+5:30

करमाळा : तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर राजेश शहा, रविकिरण पवार, ...

Corona warriors felicitated at Karmala | करमाळ्यात कोरोना योद्ध्यांचा सत्कार

करमाळ्यात कोरोना योद्ध्यांचा सत्कार

करमाळा : तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉक्टर राजेश शहा, रविकिरण पवार, अडसूळ, नेटके, शिंदे, कुलकर्णी, अक्षय पुंडे, घोलप, श्रीराम परदेशी, लावंड, सोनवणे, शिंदे यासह करमाळा कुटिर रुग्णालयातील डॉक्टर, रुग्ण सेविका, नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक जब्बार खान व त्यांचे सहकारी अशा २५ कोरोना योद्ध्यांचा शाल, श्रीफळ, कमलादेवीची प्रतिमा व लेखणी देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमासाठी पत्रकार प्रा. अशोक नरसाळे, दिनेश मडके, दस्तगीर मुजावर, जयंत दळवी, अश्पाक सय्यद, संजय मस्कर, सचिन जव्हेरी, शेखर स्वामी, नागेश चेंडगे, शंभुराजे फरतडे, बाळासाहेब भिसे, राजाराम माने, अतुल बोकन, सचिन हिरडे, अविनाश जोशी, अलीम शेख, आयुब शेख, अण्णा काळे, विशाल घोलप, जयंत कोष्टी उपस्थित होते.

---

फोटो : ०६ करमाळा

करमाळ्यात कोरोना योद्ध्यांच्या सत्कार समारंभात बोलताना तहसीलदार समीर माने.

Web Title: Corona warriors felicitated at Karmala