काँग्रेसच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी बाेगस कागदपत्रे रंगवली, माजी तालुकाध्यक्षांचा आराेप

By राकेश कदम | Published: June 9, 2023 01:36 PM2023-06-09T13:36:20+5:302023-06-09T13:36:29+5:30

टिळक भवनासमाेर आंदाेलनाचा इशारा

Congress election officials forged bogus documents former taluk president alleges | काँग्रेसच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी बाेगस कागदपत्रे रंगवली, माजी तालुकाध्यक्षांचा आराेप

काँग्रेसच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी बाेगस कागदपत्रे रंगवली, माजी तालुकाध्यक्षांचा आराेप

googlenewsNext

काॅंग्रेसचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जुगलकिशाेर प्रजापती आणि चैतन्य पुरंदरे यांनी बाेगस कागदपत्रांद्वारे तालुकाध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया राबविली. या निवडणुकीची कागदपत्रे सादर करा अन्यथा मुंबईतील टिळक भवनासमाेर आंदाेलन करू, असा इशारा काॅंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नंदकुमार पवार, माढ्याचे साैदागर जाधव यांनी दिला आहे. 

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच काॅंग्रेस तालुकाध्यक्षांच्या निवडी झाल्या. या निवडी काही तालुक्यातील नेत्यांना मान्य नाहीत. या माजी तालुकाध्यक्षांनी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांना निवेदन पाठविले आहे. काॅंग्रेसची जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया बाेगस कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा आराेप या नेत्यांनी केला आहे. या निवडणूक प्रक्रियेची कागदपत्रे सादर करण्यात यावीत. या निवडींमध्ये सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांना डावलण्यात आल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे.

या पत्रावर सांगाेल्याचे सुनील भाेरे, पंढरपूरचे अमरजीत पाटील, माेहाेळचे सुरेश शिवपुजे, बार्शीचे तानाजीराव जगदाळे यांच्या सह्या आहे. जिल्हाध्यक्ष धवलसिंह माेहिते-पाटील यांच्याकडून कागदपत्रे मिळत नाहीत. त्यामुळेच आंदाेलनाचा इशारा दिल्याचे साैदागर जाधव यांनी सांगितले. 

काॅंग्रेसची एक घटना आहे. या घटनेनुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी झाल्या. या निवडीवर अविश्वास दाखविणे म्हणजे पक्षाच्या घटनेवर अविश्वास दाखविणे आहे. सर्वच तालुकाध्यक्षांनी काम सुरू केले आहे. आमचा संघर्ष आता भाजपसाेबत आहे. आता आम्हाला यावर काही बाेलायचे नाही. प्रदेश काॅंग्रेसचे नेतेच तक्रारदारांच्या निवेदनावर निर्णय घेतील. 
विजय हत्तूरे,
वरिष्ठ उपाध्यक्ष, जिल्हा काॅंग्रेस कमिटी.

Web Title: Congress election officials forged bogus documents former taluk president alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.