शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आतां जावें पंढरीसी। दंडवत विठोबासी।

By admin | Updated: July 8, 2014 00:39 IST

पंढरीत चार लाख भाविक; गोपाळपूरपर्यंत पददर्शन रांग, रांगेत एक लाख वारकरी

 पंढरपूर: ‘आता जावें पंढरीसी।दंडवत विठोबासी।।१।। चंद्रभागेचिया तीरीं।आम्हीं नाचों पंढरपुरीं।।२।। जेथें संतांची दाटणी।त्यांचे घेऊं पायवाणी।।३।। तुका म्हणे आम्ही बळी।जीव दिला पायां तळीं।।४।।’आषाढी सोहळ्यासाठी ऊन, वारा, थंडी, ताप, पाऊस यांची तमा न बाळगता विठ्ठलाला दंडवत घालण्यासाठी पायी चालत आलेल्या वारकऱ्यांना आता आषाढी सोहळ्याचे वेध लागले आहेत. ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्यांमधील वारकरी पंढरी जवळ आल्याच्या आनंदात खेळत बागडत वाखरीच्या मुक्कामी विसावले असून, या पालख्या मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. पंढरीत चार लाख भाविकांची दाटी झाली आहे.संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली भंडीशेगावचा मुक्काम हलवून वाखरीकडे मार्गस्थ होताच उभे आणि गोल रिंगण सोहळा करीत वाखरीच्या मुक्कामी विसावले तर जगद्गुरू संत तुकोबाराय पिराची कुरोलीतून निघून रिंगण करीत तेही वाखरीच्या पालखीतळाच्या मुक्कामी विसावले आहेत. रविवारी रात्री भोजनानंतर दहाच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने टाळ-मृदंगाच्या गजरात विठुनामात रात्रभर तल्लीन झालेले वारकरी मात्र पंढरीत पोहोचल्यानंतर वरूणराजा पावल्याच्या आनंदात मोठ्या उत्साहाने रिंगण सोहळ्यात सहभागी झाले होते. पंढरीही आली आणि पाऊसही झाला, असा भाव त्यांच्या मनी होता. ‘दया तिचे नाव भूतांचे पालन। आणिक निर्दालन कंटकांचे।।’ कंटकांचे निर्दालन करणाऱ्या विठ्ठलाचे दर्शन आता लवकरच होणार असल्याने वारकरी मात्र वाखरीच्या मुक्काम स्थळावर एका रात्रीसाठी विसावले. तुकोबा, ज्ञानोबा, सोपानकाका, निवृत्तीनाथ या सर्व पालख्या पंढरपूर समीप आल्या आहेत. मुक्ताबाई, एकनाथ, गजानन महाराजांच्या पालख्या पंढरीत दाखल झाल्या आहेत.विठ्ठलाची पददर्शन रांग ज्ञानेश्वर दर्शन मंडप, सेतू, सारडा भवन, नऊ दर्शन पत्राशेड ओलांडून गोपाळपूर पोलीस चौकीपर्यंत पोहोचली असून, यामध्ये सव्वा लाख भाविक आहेत. एका भाविकाला नऊ ते साडेनऊ तासांचा कालावधी दर्शनासाठी लागत असल्याचे ज्ञानेश्वर भीमराव भिसे (रा. पिंपरीखेडा) व महादेव खिस्ते (रा. निवळी, ता. जिंतूर, जि. परभणी) यांनी सांगितले. मुखदर्शन रांगेतही अडीच ते तीन हजार भाविक असून, त्यांनाही अर्धा ते पाऊण तासात दर्शन मिळत असून, आॅनलाइनसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी सांगितले.