बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

By Admin | Updated: May 3, 2014 14:44 IST2014-05-03T13:23:37+5:302014-05-03T14:44:22+5:30

कुर्डूवाडी शहरात महात्मा संत बसवेश्वर यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली.

Celebrating Basaveshwar Jayanti | बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

कुडरूवाडी : कुर्डूवाडी शहरात महात्मा संत बसवेश्वर यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रम, मिरवणूक, महाप्रसाद आदी कार्यक्रम राबविण्यात आले.
गांधी चौक येथे बसवेश्वरांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना जिव्हाळा विद्यामंदिराचे संस्थापक शिवराज वायचळ यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत शेंडे हे होते. यावेळी धन्यकुमार ठोकडे, चंदुलाल मिठारी, उमाकांत गाढवे, अविनाश मिठारी, संतोष शेंडे, सागर कोले, अनिल कोले, राहुल शेटे, विशाल गाढवे, स्वप्नील शेटे, ललू तडकासे, गणेश फल्ले आदींसह वीरशैव समाज मोठय़ा संख्येने उपस्थित होता. यावेळी शिवस्मारक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब गवळी व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दत्ताजी गवळी यांनीही मूर्तीस पुष्पहार अर्पण केला.
बसवेश्वर मंदिर येथे र्शींचा जन्मसोहळा वीरशैव महिला भजनी मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी समाजातील अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या. यानंतर बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक सवाद्य काढण्यात आली. मिरवणुकीचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाजातील लहानथोर मंडळी उपस्थित होते.

Web Title: Celebrating Basaveshwar Jayanti