शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी प्रकरणी पंढरीत गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 22:47 IST

काही आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्ड वरील असल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. 

पंढरपूर :- शहरातील व्यापाऱ्याला एक लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुरज केरप्पा पडवळकर ( वय-२५, धंदा -उद्योग व्यापार, रा. भोसले चौक पंढरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शंकर सुरवसे , ज्ञानेश्वर कडलासकर उर्फ महाराज , वैभव फसलकर , सचिन आवताडे आणि इतर ३ ते ४ अनोळखी व्यक्तींच्या  विरोधात गुन्हा दाखल झालाय .पडवळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,  फिर्यादीचा मित्र वैभव फसलकर याचा मेव्हणा ज्ञानेश्वर कडलासकर याच्याशी तोंड ओळख होती. ज्ञानेश्वर याने फिर्यादी पडवळकर याने घेतलेली नवी दुचाकी चक्कर मारून येतो म्हणून घेवून गेला. आणि परत दिली नाही. यावर पडवळकर यांनी घडला प्रकार आपला मित्र वैभव याच्या कानावर घातला . मात्र वैभव फसलकर याने पडवळकर याला शिवीगाळ केली. त्यानंतर सदरची मोटारसायकल नवीपेठ भागात शंकर सुरवसे याच्याकडे दिसून आली. सुरवसेला दुचाकी मागीतली असता त्यानेही ती परत देण्यास नकार दिला म्हणून पडवळकर याने दुसऱ्या चावीने सदरची दुचाकी शंकर सुरवसेच्या घरासमोरून ताब्यात घेतली. सदरचा प्रकार मिटवण्यासाठी सुरवसे, फसलकर , कडलासकर आणि आवताडे यांनी पडवळकरला प्रांत कार्यालयासमोर बोलावून घेतले. आज सोमवारी सकाळी पडवळकरच्या घरी वरील आरोपी आले. त्यांनी पडवळकरला बोलेरो जीप मधून सांगोला रोड कडे निघाले . जात असताना त्यांनी पडवळकरला मारहाण करुन एक लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर दहा हजार रुपये घेवून प्रकरण मिटवण्यात आले. सचिन आवताडे हा पैसे मोजत असताना फिर्यादी पडवळकर आरोपींची नजर चुकवून पळून गेला. यातील काही आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्ड वरील असल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. या प्रकरणी भादविक ३६४(अ), ३८५,३८६,३८७,१४३,१४७,१४९,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केली असल्याची माहिती पो. नि. दयानंद गावडे यांनी दिलीय. पुढील तपास स. पो. नि . करे हे करीत आहेत .

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीPandharpurपंढरपूर