शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सहा लाखांच्या सोनसाखळ्या देऊन सराफाला गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST

मोहोळ : ओळखीचा फायदा घेत तांबे व इतर धातू मिक्स करून बनवलेल्या सहा लाख दहा हजारांच्या बनावट सोनसाखळ्या ...

मोहोळ : ओळखीचा फायदा घेत तांबे व इतर धातू मिक्स करून बनवलेल्या सहा लाख दहा हजारांच्या बनावट सोनसाखळ्या देऊन एका सराफाची फसवणूक केली.

२६ जानेवारी रोजी ही घटना घडली असून, या प्रकरणी मोहोळ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधितांपैकी एकाला मोहोळ येथील न्यायालयात हजर केले असता ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार सोलापूर शहरातील रहिवासी सराफ मारुती रेवणकर यांचे सावळेश्वर (ता. मोहोळ) येथे गंगा ज्वेलर्स नावाने दुकान आहे. सावळेश्वर येथून त्यांच्या दुकानात नेहमी येणारे पप्पू ऊर्फ दावल तांबोळी याने ६ जानेवारी ते १५ जानेवारीदरम्यान लॉकडाऊन काळात आला आणि पैशाची गरज आहे, असे सांगत सोन्याचे कोटींग व होलमार्क असलेल्या ८० गॅम वजनाच्या तीन साखळ्या देऊन दोन लाख साठ हजार रुपये नेले होते. त्यानंतर १२ जुलै रोजी पुन्हा त्याने एकसारख्या दिसणाऱ्या चार चेन आणल्या. त्याच्या बदल्यात त्यास साडेतीन लाख रुपये दिले. त्यानंतर त्या सराफास संशय आल्याने त्या सर्व चेन सोलापूर येथील सराफांकडे तपासल्या असता त्या बोगस असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्या सोनाराने पप्पू तांबोळी यास विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत धमकावत पैसे परत आणून देतो म्हणाला आणि तीन चेन घेऊन गेला.

दरम्यान, २६ जानेवारी रोजी इस्माईल युन्नूस मन्यार हा त्या सराफाकडे १० ग्रॅमची चेन व ५ ग्रॅमची चेन घेऊन आला. त्यावर गहाण ठेवून पैसे मागू लागला. त्यावेळी त्या सराफाच्या लक्षात आले की, आपली फसवणूक होत आहे. त्यांनी मोहोळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्यातील एकास तत्काळ ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता मोहोळच्या एका बँकेत दहा तोळे सोने ठेवले असून, त्याच्या टोळीतील साथीदारांनी जिल्ह्यात इतर ठिकाणी ही फसवणूक केली असल्याची कबुली दिली आहे.

याबाबत दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून एकास अटक करून न्यायालयात उभे केले असता त्यास ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे करीत आहेत.