मालट्रक अंगावरुन गेल्याने गवंडी कामगार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:25 IST2021-03-09T04:25:07+5:302021-03-09T04:25:07+5:30

रावसाहेब धुळा कर्णवर (वय ५३, रा. जवळा- कर्णवरवस्ती) असे मृत गवंडी कामगाराचे नाव आहे. तर इब्राहिम अब्दुल शेख (रा. ...

The bricklayer was killed on the spot when the truck overturned | मालट्रक अंगावरुन गेल्याने गवंडी कामगार जागीच ठार

मालट्रक अंगावरुन गेल्याने गवंडी कामगार जागीच ठार

रावसाहेब धुळा कर्णवर (वय ५३, रा. जवळा- कर्णवरवस्ती) असे मृत गवंडी कामगाराचे नाव आहे. तर इब्राहिम अब्दुल शेख (रा. जवळा-शेखवस्ती, ता. सांगोला) असे जखमीचे नावे आहे.

जवळा-शेखवस्ती येथील इब्राहिम अब्दुल शेख यांनी भोपसेवाडी येथे बांधकाम घेतले होते. ८ मार्च रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास ते (एमएच ४५-एके ०३८०) दुचाकीवरून पाठीमागे वृद्ध गवंडी कामगार रावसाहेब धुळा कर्णवर यांना बसवून जवळा ते भोपसेवाडी रोडने निघाले होते. दरम्यान, वाकीतून जवळ्याकडे (एमएच ४५- टी ०९०१) जाणाऱ्या मालट्रकने दुचाकीला घेरडी पाटीजवळ पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकी रस्त्यावर पडल्याने मालट्रकचे डाव्या बाजूची चाके रावसाहेब कर्णवर यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. तर इब्राहिम शेख किरकोळ जखमी होऊन बेशुद्ध पडले.

अपघातानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वसगडे व पोलीस नाईक लेंडवे यांनी अपघाताचा पंचनामा केला. याबाबत इब्राहिम अब्दुल शेख (रा. जवळा-शेखवस्ती) यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The bricklayer was killed on the spot when the truck overturned