वृद्धाचा खून करून दोघांना जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:41 IST2020-12-05T04:41:22+5:302020-12-05T04:41:22+5:30

केल्याप्रकरणी सहा जण निर्दोष सोलापूर : किरकोळ कारणावरुन नवनाथ भाऊ जाधव (वय ६५) याचा तलवार,लोखंडी पाईप व काठीने मारून ...

Both were injured in the murder of an old man | वृद्धाचा खून करून दोघांना जखमी

वृद्धाचा खून करून दोघांना जखमी

केल्याप्रकरणी सहा जण निर्दोष

सोलापूर : किरकोळ कारणावरुन नवनाथ भाऊ जाधव (वय ६५) याचा तलवार,लोखंडी पाईप व काठीने मारून खून केला. दरम्यान, सोडविण्यास आलेली त्याची पत्नी छाया नवनाथ जाधव व मुलगा भैरू नवनाथ जाधव यांना मारहाण करून जखमी केल्याच्या आरोपातून सहा जणांची बार्शीचे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. अग्रवाल यांनी सहा जणांची निर्दोष मुक्तता केली.

श्रीराम दशरथ बारंगुळे, अनिल नरहरी बारंगुळे, दशरथ शिवाजी बारंगुळे, बापू शिवाजी बारंगुळे, परमेश्वर विठ्ठल साळुंखे, मंदाकिनी दशरथ बारंगुळे (सर्व रा.खांडवी, ता. बार्शी) अशी निर्दोष सुटलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. निखिल पाटील यांनी तर अनिल बारंगुळे व परमेश्वर साळुंखे यांच्यातर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. शरद झाल्टे यांनी तर सरकारतर्फे ॲड. प्रदीपसिंह रजपूत यांनी काम पाहिले.

Web Title: Both were injured in the murder of an old man