ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक; सोलापूर जिल्ह्यात नऊ ठिकाणी चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 12:42 PM2021-06-26T12:42:36+5:302021-06-26T12:43:07+5:30

सोलापूर : ओबीसी आरक्षणासाठी भाजपच्या वतीने जिल्ह्यात सर्वत्र आंदोलन शांततेत सुरू आहे. काही ठिकाणी आंदोलकाना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ...

BJP aggressive for OBC reservation; Chakkajam at nine places in Solapur district | ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक; सोलापूर जिल्ह्यात नऊ ठिकाणी चक्काजाम

ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक; सोलापूर जिल्ह्यात नऊ ठिकाणी चक्काजाम

googlenewsNext

सोलापूर : ओबीसी आरक्षणासाठी भाजपच्या वतीने जिल्ह्यात सर्वत्र आंदोलन शांततेत सुरू आहे. काही ठिकाणी आंदोलकाना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोलापूर शहरासह सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट आदी तालुक्यात भाजपने आंदोलन केले आहे. 

सोलापूर शहरात हैदराबाद रस्त्यावर सिद्धेश्वर मार्केट यार्ड समोर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. आमदार विजय देशमुख शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या नेतृत्वात विविध आघाड्यांचे प्रमुख नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. जवळपास दीड तास चक्का जाम आंदोलन झाल्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या.

हैदराबाद रस्त्याच्या चक्काजाम आंदोलनामुळे विजापूर कडून तसेच पुणे रस्त्यावरून हैदराबादच्या दिशेने जाणारी वाहन आहे तिथेच थांबवण्यात आली होती, पोलिसांनी दोनशेवर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल आहे. आमदार विजय देशमुख आणि विक्रम देशमुख यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना ही ताब्यात घेण्यात आलं आहे.

Web Title: BJP aggressive for OBC reservation; Chakkajam at nine places in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.