शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

रणजीत शिंदेंना मोठा दिलासा; दूध संघाची चौकशीच प्रशासनाने केली रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:27 IST

मागील संचालक मंडळाने केलेल्या गैरकृत्यांना या संचालक मंडळाला जबाबदार धरता येणार नाही, असे म्हटले आहे.

Ranjeet Shinde : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या कारभाराची विविध मुद्द्यांवर ८३ अन्वये केलेल्या चौकशीवर ८८ च्या चौकशीचे विभागीय उपनिबंधकांचे आदेश राज्य शासनाचे सहनिबंधक (दुग्ध) मुंबई यांनी रद्द केले आहेत. त्यामुळे दूध संघाच्या संचालक मंडळाची चौकशी आजतरी टळली आहे. मागील संचालक मंडळाने केलेल्या गैरकृत्यांना या संचालक मंडळाला जबाबदार धरता येणार नाही, असा निष्कर्ष मुंबई विभागाचे सहनिबंधक शहाजी पाटील यांनी काढला आहे. परिणामी चेअरमन रणजीत शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या गैरकारभाराची चौकशी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) वैशाली साळवे यांनी केली होती. या चौकशी अहवालावर विभागीय सहनिबंधक महेश कदम यांनी ८८ अन्वये चौकशीसाठी जी. पी. कदम यांची नियुक्ती केली होती. ८८ अन्वये चौकशीला सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे चेअरमन रणजीत शिंदे, संचालक राजेंद्र मोरे व राजेंद्रसिंह पाटील यांनी सहनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) मुंबई शहाजी पाटील यांच्याकडे अपील केले होते. पाटील यांनी चेअरमन रणजीत शिंदे यांची चौकशीला स्थगिती देण्याची मागणी मान्य करत तसे आदेश २१ जून २०२४ रोजी काढले होते. त्यामुळे साळवे यांच्या अहवालावरून सुरू केलेली ८८ ची चौकशी थांबली होती. त्यानंतर सहनिबंधक शहाजी पाटील यांनी सुनावणी घेऊन चार फेब्रुवारीला ८८ अन्वये चौकशी रद्द करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे संचालक मंडळावरील चौकशीचा फेरा आज तरी थांबला आहे.

चेअरमन वसुलीसाठी प्रयत्नशील..दूध संघाचे चेअरमन रणजीत शिंदे व इतरांच्या वतीने अॅड. मिलिंद प्रभुणे यांनी दिलेल्या मुद्द्यांवर सहनिबंधक (दुग्ध) मुंबई शहाजी पाटील यांनी काढलेल्या निष्कर्षात मागील संचालक मंडळाने केलेल्या गैरकृत्यांना या संचालक मंडळाला जबाबदार धरता येणार नाही, असे म्हटले आहे.

वसुलीसाठी प्रयत्न- दूध संस्थांना दिलेली अग्रीम रक्कम ही ७-८ वर्षांपुर्वी दिलेली असून चालू व्यवस्थापकीय समितीने ती दिलेली नाही. संचालक मंडळाने २०२३-२४ या वर्षांत १३ लाख ६१ हजार ८२८ व १८ लाख ३१ हजार ७३९ रुपये वसूल केली आहे.- अर्जदार चेअरमन शिंदे व इतर थकबाकी वसुलीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे शहाजी पाटील यांनी निष्कर्षात म्हटले आहे. पाटील यांनी अभिप्रायात दूध संघाचे सध्याचे व्यवस्थापकीय मंडळ वसुलीसाठी प्रयत्न करीत असल्याचे म्हटले आहे.- सोमवारी संचालक मंडळ बरखास्तीच्या कारवाईवर संचालक संभाजी मोरे यांच्या अपिलावर सुनावणी घेतली. त्यात संचालक मंडळ बरखास्तीची कारवाई स्थगित केली असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसbankबँक