शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बी.ए.एम.एस. डॉक्टरांचा ‘अ-१’ प्रवर्गात समावेश होणार

By admin | Updated: July 7, 2014 00:49 IST

१० हजार डॉक्टरांना लाभ: निमा व कृती समितीच्या प्रयत्नांना यश

सोलापूर : कर्नाटक व गोवा राज्यातून बी.ए.एम.एस. डॉक्टरांचा महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन, मुंबई या संस्थेकडून ‘अ-१’ या प्रवर्गात समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. मंदार रानडे यांनी पत्रपरिषदेत दिली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाबाबत गेल्या दोन वर्षांत ई-शेड्यूल कृती समितीने आणि निमाने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. यामुळे कर्नाटक व गोवा या राज्यातून बी.ए.एम.एस. पदवीप्राप्त व महाराष्ट्रात रहिवास व व्यवसाय करणाऱ्या १० हजार डॉक्टरांना शासकीय योजनेचा लाभ मिळणार आहे. कर्नाटक व गोवा राज्यातून बी.ए.एम.एस. झाल्यानंतर महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन (एम.सी.आय.एम.) या संस्थेमध्ये नोंदणी करावी लागते. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अ‍ॅक्ट १९६१ (एम.एम.पी. अ‍ॅक्ट) नुसार या विद्यापीठातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा ‘ई’ प्रवर्गामध्ये समावेश करण्यात येतो. देशस्तरावर या दोन्ही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाला सेंट्रल कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन (सी.सी.आय.एम.) दिल्ली या संस्थेद्वारा प्रमाणित करण्यात येते. असे असताना प्रवर्ग ‘ई’मध्ये समाविष्ट केल्यामुळे या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात व्यवसाय करण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अडचणी येत होत्या. या विषयाचा सखोल अभ्यास केला असता असे लक्षात आले की, एम.एम.पी. अ‍ॅक्ट-१९६१ च्या कलम २९(१) नुसार महाराष्ट्र शासन स्वत:च्या अधिकाराखाली प्रवर्ग सुधारणा करू शकते. यासाठी प्रथम एम.सी.आय.एम. चे डॉ. वांगे यांची भेट घेऊन सर्व अडचणी सांगितल्या. डॉ. वांगे यांनी याचा सकारात्मक विचार करून एक प्रस्ताव बनविला व तो डॉ. कुलदीपराज कोहली (आयुर्वेद संचालनालय, महाराष्ट्र शासन) यांच्याकडे पाठविला. डॉ. कोहली यांनी या प्रस्तावाचा अभ्यास करून तो पुढे वैद्यकीय शिक्षण विभाग, मुंबई यांच्याकडे पाठविला. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची भेट घेतली. डॉ. म्हैसकर यांनी प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. या प्रस्तावाबाबत विधी व न्याय विभागाने समितीच्या बाजूने निर्णय दिला. त्यानुसार डॉ. म्हैसकर यांनी कर्नाटक व गोवा राज्यातून बी.ए.एम.एस. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा ‘ई’ प्रवर्गातून ‘ए-१’ प्रवर्गात समावेश करण्याचे आदेश दिले आहेत, असे डॉ. मंदार रानडे यांनी सांगितले. यावेळी डॉ. नितीन बलदवा, विनायक टेंभुर्णीकर, डॉ. अभिजित भरमगोंडा, डॉ. भरत चौगुले, डॉ. रमाकांत आयाचित, डॉ. जयसिंग पांढरे उपस्थित होते. ---------------------कृतज्ञता सोहळा...बी.ए.एम.एस. डॉक्टरांचा ‘अ-१’ प्रवर्गात समावेश करण्यात आल्याने महाराष्ट्र शासनाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दि. १३ जुलै रोजी सकाळी १० वा. राजगौरव मंगल कार्यालय, कदमवाडी रोड, कोल्हापूर येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.