सुपर बझार फोडणाऱ्यांना अटक

By Admin | Updated: June 25, 2014 01:47 IST2014-06-25T01:47:51+5:302014-06-25T01:47:51+5:30

सोलापूर : महापौर बंगल्यासमोरील लोकमंगल सुपर बझार फोडून चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

The arrest of those who have killed Super Bazaar | सुपर बझार फोडणाऱ्यांना अटक

सुपर बझार फोडणाऱ्यांना अटक


सोलापूर : महापौर बंगल्यासमोरील लोकमंगल सुपर बझार फोडून चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
हणमंतु लक्ष्मण केचनाळकर (रा. धाकटी ईरण्णावस्ती), सिद्राम उर्फ श्रीकांत सिद्धारूढ गंजी (रा. नीलमनगर, दासरी दवाखान्यासमोर सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. २२ जून रोजी पहाटे चोरट्यांनी लोकमंगल सुपर बझारचे शटर उचकटून आतील कपाटातील सोन्याची तीन नाणी, मोबाईल हँडसेट, रोकड असा ४४ हजार २४५ रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. संदीप गुरमे, हवालदार जाधव, नाईक मुन्ना शेख, गाडे, पो. कॉ. भीमदे . फुटाणे, शिर्के, फिरोज जमादार, सरतापे यांनी परिसरात सापळा लावून रेकॉर्डवरील आरोपींचा शोध सुरू केला.
सायबर सेलकडून चोरीला गेलेल्या मोबाईलची माहिती घेतली. स्टेशन चौकातील पान शॉपजवळ चोरीतील हँडसेट विक्रीसाठी दोन तरुण आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना पकडले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसी खाक्या दाखविल्यावर आरोपींनी चोरीतील हँडसेट, सोन्याची व चांदीची नाणी असा एकूण २३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

Web Title: The arrest of those who have killed Super Bazaar