शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मठांना अनुदान देण्याची घोषणा हवेतच!

By admin | Updated: June 24, 2014 16:29 IST

शौचालय बांधकाम: सहा मठांमध्ये ४१ स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण

पंढरपूर:पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी शासनाने मठांमध्ये शौचालयांचे बांधकाम करण्यासाठी ५० टक्के अनुदान जाहीर केले. यासाठी मठाधिपतींनी पाठपुरावाही केला, मात्र अद्यापपर्यंत हे अनुदान मिळाले नाही. यामुळे शौचालय बांधकामासाठी निधी कमी पडत असल्याने मठाधिपती हतबल झाले आहेत. आतापर्यंत सहा मठांमध्ये ४१ शौचालयांचे बांधकाम देणगीतून करण्यात आले आहे.मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर यांच्या खंडपीठाने आषाढीपूर्वी शौचालयांचे बांधकाम पूर्ण करा; अन्यथा भाविकांच्या पंढरीतील प्रवेशावर निर्बंध घालण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पंढरपुरात स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी १० दिवसांत चार हजार शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याची हमी देत त्याबरोबरच तसे नियोजनही केले आहे. यापूर्वी सन २००२ साली स्वच्छतेसाठी पंढरपुरात श्रीक्षेत्र पंढरपूर शुचिता अभियानाची स्थापना करून शौचालय बांधकामाचे काम सुरू केले. आतापर्यंत २०० तात्पुरते शौचालय बांधून नगरपालिकेच्या ताब्यात दिले आहेत.दरम्यान, या अभियानांतर्गत शासनाकडे निधी व जागेसाठी पाठपुरावा केला असता पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सार्वजनिक ठिकाणी शासनाच्या वतीने शौचालयांचे बांधकाम करण्यात येणार असून, मठांमध्ये शौचालय बांधकामासाठी प्रबोधन करण्याचा सल्ला दिला. यामुळे पंढरपुरातील २० मठमालकांनी २०० शौचालय बांधून देण्याची मागणी केली; मात्र यासाठी शासनाकडून अनुदान मिळत नसल्याने त्यांना स्वखर्चाने व देणगीतून बांधकाम करावे लागत आहे. आतापर्यंत ५ लाख ९५ हजार ४ रुपये इतकी देणगी जमा झाली असून, ६ लाख २७ हजार ५०६ रुपयांतून सहा मठांमध्ये ४१ शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे. ---------------------------------उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंढरपुरातील संस्थांनी जागे होऊन शौचालयांचे बांधकाम पूर्ण करणे गरजेचे आहे. आतापर्यंत मठमालकांमध्ये प्रबोधन करून हजार ते पंधराशे शौचालये बांधण्यास प्रवृत्त केले आहे; मात्र मठांमध्ये शौचालय बांधण्यासाठी जाहीर केलेले ५० टक्के अनुदान मात्र अद्यापपर्यंत मिळाले नाही.- बाळासाहेब चव्हाण सचिव, श्रीक्षेत्र पंढरपूर शुचिता अभियान, पंढरपूर