शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अन् पोलीस बंदोबस्त वाढविला

By admin | Updated: May 17, 2014 00:44 IST

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विरोधात महायुतीच्या उमेदवाराने आघाडी घेतल्यावर पोलिसांनी अचानकपणे बंदोबस्तात वाढ केली.

 

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विरोधात महायुतीच्या उमेदवाराने आघाडी घेतल्यावर पोलिसांनी अचानकपणे बंदोबस्तात वाढ केली. निकालानंतर कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. रामवाडी गोदामावर शुक्रवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून सोलापूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधातील महायुतीचे उमेदवार अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी आघाडी घेतली. निकालाचे वृत्त व्हॉटस्अप, रेडिओवरून बाहेर येऊ लागल्यावर भाजप, सेना कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली. दुपारी बारानंतर चित्र स्पष्ट झाल्यानंतर मोदी, सात रस्ता, विजापूर वेस, पांजरापोळ चौक आदी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. दुपारी उन्हाचा कडाका वाढल्यानंतर रस्त्यावरील वर्दळ कमी झाली. काँग्रेसभवन येथे शुकशुकाट जाणवत होता. कुमठा नाका येथे वैयक्तिक भांडणातून दगडफेक झाल्याचे वृत्त येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आयुक्तालयात कमांडो व स्ट्रायकिंंग फोर्स राखीव ठेवण्यात आला होता, तर मोदी गेटजवळ पोलिसांनी नाकेबंदी केली होती. या ठिकाणी वरुण वाहनासह पोलीस सज्ज होते. या ठिकाणी ध्वनिक्षेपकावर निकाल ऐकण्याची सोय करण्यात आली होती. त्यामुळे याठिकाणी माढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पोलीस आयुक्त प्रदीप रासकर वायरलेसवर सूचना देत होते. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची शहरात फिरती गस्त होती. माढा मतदारसंघातील लढत चुरशीची झाली होती. निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचविणारी ठरली. सुरुवातीला पिछाडीवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी शेवटच्या काही फेर्‍यात आघाडी घेतली. अकलूज येथे खुद्द पोलीस अधीक्षक मकरंद रानडे ठाण मांडून होते. नियंत्रण कक्षात विशेष पथक राखीव ठेवण्यात आले होते. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी अकलूजला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली त्यानंतर दुपारनंतर ते सोलापुरात दाखल झाले. निकालानंतर जल्लोष शांततेत पार पडल्यावर ते कोल्हापूरकडे रवाना झाले.