मांडेगावात आधार कार्ड शिबीर; १४० जणांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:47 IST2021-02-05T06:47:12+5:302021-02-05T06:47:12+5:30

प्रारंभी निवासी नायब तहसीलदार संजीव मुंढे , डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी अमित देशमुख, सरपंच पंडित मिरगणे व मान्यवरांच्या ...

Aadhar card camp in Mandegaon; 140 people took advantage | मांडेगावात आधार कार्ड शिबीर; १४० जणांनी घेतला लाभ

मांडेगावात आधार कार्ड शिबीर; १४० जणांनी घेतला लाभ

प्रारंभी निवासी नायब तहसीलदार संजीव मुंढे , डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी अमित देशमुख, सरपंच पंडित मिरगणे व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांना वंदन करण्यात आले.

या शिबिरामध्ये नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करणे तसेच पोस्ट विभागाच्या वतीने जनतेसाठी राबविलेल्या शासकीय विविध योजनांची माहिती देणे आदी उपक्रम राबविण्यात आले. पोस्ट विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. गाव सुकन्या ग्राम व डिजीटल इंडिया ग्राम बनवण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन अधिकारी अमित देशमुख यांनी केले.

याप्रसंगी प्रणाली प्रबंधक माधव बारस्कर, डाक आवेक्षक अजित नडगिरे, रवींद्र बगाडे, पोस्टमास्तर नागेश कोळी, ब्रँच पोस्ट मास्तर गणेश पवार, पांडुरंग भांगे उंबर्गे,लता मिरगणे, लक्ष्मी शिंदे, सुनीता मिरगणे, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Aadhar card camp in Mandegaon; 140 people took advantage