चौदा वर्षाचा मुलगा सायंकाळी घरातून गेला; रविवारी पहाटे त्याचा मृतदेह आढळून आला!

By संताजी शिंदे | Published: January 14, 2024 05:52 PM2024-01-14T17:52:38+5:302024-01-14T17:52:57+5:30

बाहेर जाऊन येतो असे सांगून घरातून गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा, रविवारी पहाटेच्या सुमारास तुळजापूर रोडवर मृतदेह आढळून आला.

A fourteen-year-old boy left home in the evening His body was found early Sunday morning! | चौदा वर्षाचा मुलगा सायंकाळी घरातून गेला; रविवारी पहाटे त्याचा मृतदेह आढळून आला!

चौदा वर्षाचा मुलगा सायंकाळी घरातून गेला; रविवारी पहाटे त्याचा मृतदेह आढळून आला!

सोलापूर: बाहेर जाऊन येतो असे सांगून घरातून गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा, रविवारी पहाटेच्या सुमारास तुळजापूर रोडवर मृतदेह आढळून आला. या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशाल विजय बट्टू (वय १४ रा. घोगंडे वस्ती) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. विशाल बट्टू हा घोंगडे वस्ती रहात होता, शनिवारी रात्री ८ वाजता तो बाहेर जाऊन येतो म्हणून घरातून बाहेर पडला. तो रात्री उशीर झाला तरी परत आला नाही. 

घरच्यांनी शोधाशोध केली, मात्र तो कोठेही आढळून आला नाही. शेवटी घरातील लोकांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. विशाल निघून गेल्याची माहिती दिली. पहाटेच्या सुमारास तुळजापूर रोडवरील सर्व्हिस रोडवर मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता, तो मृतदेह विशाल बट्टू याचा असल्याचे निदर्शनास आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याची नोंद जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात झाली आहे.
 

Web Title: A fourteen-year-old boy left home in the evening His body was found early Sunday morning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.