मतदानासाठी कुटुंबीय केंद्रात गेले, संधी साधून चोरट्याने घर साफ केले

By दिपक दुपारगुडे | Published: May 8, 2024 08:04 PM2024-05-08T20:04:32+5:302024-05-08T20:04:44+5:30

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले.

a family went to the center to vote, taking the opportunity, the thief cleaned the house | मतदानासाठी कुटुंबीय केंद्रात गेले, संधी साधून चोरट्याने घर साफ केले

मतदानासाठी कुटुंबीय केंद्रात गेले, संधी साधून चोरट्याने घर साफ केले

सोलापूर : मतदानासाठी घराबाहेर गेलेल्या तळेकर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने भरदिवसा रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना भोसे येथे दि. ७ रोजी घडली. याबाबत स्वप्निल सुनील तळेकर यांनी करकंब पोलिसांत फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, तळेकर कुटुंबातील सदस्य दि. ७ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास घराच्या समोरील दरवाजाला कुलूप लावून मतदानाला गेले होते. यावेळी फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय मतदान करून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरी आले. घरी आल्यानंतर त्यांना दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला व कुलूप खाली पडलेले दिसून आले. घराचा दरवाजा उघडून आत पाहिले असता हॉलमध्ये सोन्याच्या दागिन्याची रिकामी बॉक्स व डबे अस्ताव्यस्त पडले होते. 

कपाटामधील ड्राॅवरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व मंगल कार्यालयातील लग्न हॉलचे आलेले भाडे रोख रक्कम एक लाख रुपये रकमेसह सोने-चांदीचे सुमारे ११ लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्याने लंपास केल्याची फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर हे करीत आहेत.

Web Title: a family went to the center to vote, taking the opportunity, the thief cleaned the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.