शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

५१00 पोलिसांचा बंदोबस्त

By admin | Updated: July 7, 2014 01:11 IST

बंदोबस्त तैनात

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ५१०० पोलिसांचा व अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पो. नि. किशोर नावंदे यांनी दिली.मागील तीन वर्षांपासून दुष्काळ असल्यामुळे आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत घट होणार असा सूर सर्वस्तरातून उमटत असला तरी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याने मात्र चोख बंदोबस्ताची तयारी केली आहे. देशात कुठेही बॉम्बस्फोट सारखी अतिरेकी कारवाई झाल्यास पंढरपूरलाही हाय अलर्टचा इशारा दिला जातो. तत्काळ विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरात बसस्थानक, रेल्वेस्थानक या परिसरात सुरक्षितता वाढविली जाते. सध्या आषाढी यात्रा असल्यामुळे पंढरपुरात विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी १० ते १२ लाख भाविक येत असतात. या आलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलीस प्रशासनावर पडते. यात्रा कालावधीत शहरातील प्रत्येक रस्त्यावर भाविकांची गर्दी असते. या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडून हजारो भाविकांच्या जीवास धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने ५१०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.पुणे, सोलापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यातील बॉम्बशोधक पथकही पंढरपुरात दाखल झाले आहे. सर्व अधिकारी व पोलिसांमध्ये व्यवस्थित संपर्क व्हावा, यासाठी १५० वॉकीटॉकीही मिळणार आहेत. ही सुरक्षा जादा करून विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, पालखीच्या ठिकाणी, व्हीआयपी असणाऱ्या ठिकाणी असणार आहे. हा सर्व पोलीस बंदोबस्त ३० जून ते १५ जुलैपर्यंत असणार आहे.--------------------असा असणार बंदोबस्तयामध्ये अपर पोलीस अधीक्षक ५, उपविभागीय पोलीस अधिकारी १७, पोलीस निरीक्षक ५२, उपनिरीक्षक १८५, वाहतूक पोलीस कर्मचारी ४५७, महिला पोलीस १५०, पुरूष पोलीस ३०००, महिला व पुरूष होमगार्ड २५००, त्याचबरोबर विशेष कमांडो, जलदकृती दलाची ४ पथके, एस.आर.पी.ची ३ कंपनी व बाजूच्या जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस कर्मचारी असणार आहेत.