शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

सोलापुरात ४०७ टन कचरा उचलला! धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:50 AM

अवघा महाराष्टÑ स्वच्छ व्हावा याचा ध्यास घेऊन नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी सोलापुरात स्वच्छतेसाठी हजारो ‘श्री’ सदस्यांनी आप्पा स्वारीच्या आवाहनाला प्रतिसाद देत महास्वच्छता मोहीम राबवली.

ठळक मुद्देदहा राज्यांत राबवली एकाचवेळी स्वच्छता मोहीमसोलापुरात पार पडली सातवी स्वच्छता मोहीम

सोलापूर:  अवघा महाराष्टÑ स्वच्छ व्हावा याचा ध्यास घेऊन नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी सोलापुरात स्वच्छतेसाठी हजारो ‘श्री’ सदस्यांनी आप्पा स्वारीच्या आवाहनाला प्रतिसाद देत महास्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल ४०७ टन कचरा उचलला गेला. कोणताही डामडौल न दाखवता शिस्तबद्धरित्या शहरातील ४५ मार्गांवर सोलापूर शहर-जिल्ह्यातून २१ हजार ५२२ ‘श्री’ सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. 

सकाळी ७.३० वाजता शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व बाजूलाच संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रतिष्ठापना केलेल्या संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या मोहिमेस प्रारंभ झाला. मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, देवेंद्र कोठे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ झाला. ही मोहीम अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सोलापुरातील ४५ मार्ग निवडले होते. त्यानुसार प्रत्येक मार्गावर स्वयंसेवक आणि त्यांच्यावर नियंत्रणासाठी परिवारातील सदस्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली़ त्यामुळे कोठेही विस्कळीतपणा जाणवला नाही.

या मोहिमेसाठी प्रतिष्ठानच्या वतीने या स्वच्छता मोहिमेसाठी ग्लोज व मास्क पुरविण्यात आले. झाडू, खराटे, खोºया हे साहित्य परिवारातील स्वयंसेवकांनी स्वत:हून आणले होते. याशिवाय प्रतिष्ठानमार्फत जमलेल्या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रतिष्ठानचे १३५ ट्रॅक्टर दिमतीला होते. त्याशिवाय महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फतही घंटागाड्या, पोकलेन, डंपर्स आणि कर्मचाºयांनीही सहभाग दर्शवला. 

दिवसभर विविध मार्गांवर दुपारी १२ पर्यंत ही मोहीम चालली. यानंतर किल्ला बागेमध्ये या मोहिमेची सांगता झाली. यावेळी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, महापौर शोभा बनशेट्टी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिखर बँकेचे प्रशासकीय संचालक अविनाश महागावकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी या मोहिमेचे कौतुक करुन जनतेने यातून शहर स्वच्छतेसाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा. आपले शहर, परिसर स्वच्छतेबरोबरच मानसिकता बदलायला हवी, असे आवाहन करण्यात आले.

अशी पार पाडली मोहीम- सकाळी ७.३० वाजता एकाचवेळी ४५ ठिकाणांहून स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला. हा संपूर्ण मार्ग २६२.६ कि. मी. होता. यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल, आरपीएफ कार्यालय, पोस्ट आॅफिस, रेल्वे पार्सल विभाग, न्यायालय परिसर, केंद्रीय उत्पादन शुल्क, विक्रीकर कार्यालय, जिल्हा उद्योग मार्गदर्शन कार्यालय अशा ४९ शासकीय कार्यालयांमध्येही मोहीम राबवण्यात आली. दुपारी १२ पर्यंत चाललेल्या मोहिमेत ओला कचरा २१ हजार ८७० तर सुका कचरा ३ लाख ८५ हजार ३२२ किलो असा एकूण ४०० टन कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

दहा राज्यांत राबवली एकाचवेळी स्वच्छता मोहीमडॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, केरळ, गुजरात, पश्चिम बंगाल, दिल्ली, तेलंगणा, गोवा अशा दहा राज्यांत एकाचवेळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये ४८ जिल्हे, १२३ तालुके, २ हजार ७९७ ठिकाणे, १२६३ शासकीय कार्यालये, ९३ रेल्वेस्थानके, ३३७५ रस्ते, ८.२५ कि. मी. समुद्र किनारे, १ लाख १८ हजार ८९७ श्री सदस्यांचा सहभाग, २४४३ कचरा वाहून नेण्यासाठी वाहने वापरण्यात आली. या संपूर्ण स्वच्छता मोहिमेत एकूण २८७५ टन सुका कचरा तर ८४० टन ओला कचरा असा एकूण ३७१५ टन कचरा जमा करण्यात आला. 

सोलापुरात पार पडली सातवी स्वच्छता मोहीमसद्गुरु परिवार नावाने प्रतिष्ठानच्या आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या संयोजनाखाली महाराष्टÑभर बैठका होतात. यामध्ये अध्यात्माच्या जोडीला सामाजिक आदर्श विचार पेरण्याचे काम सुरु असते. सोलापूर शहर-जिल्ह्यात ४० हून अधिक ठिकाणी अशा बैठका चालतात. स्वच्छता मोहीम ही काळाची गरज असल्याने शासकीय पातळीवरही याबद्दल सातत्याने प्रबोधन सुरु आहे. प्रतिष्ठाननेही आपल्या सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवण्यात आला. या संपूर्ण मोहिमेत कोठेही श्रेयवाद घेण्याची चढाओढ दिसून आली नाही. आप्पास्वारीचा आदेश म्हणत समोरच्या प्रत्येक सदस्यांना ‘जय सद्गुरू’ म्हणत प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असल्याचे दिसून आले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी हजारो हात सरसावले असलेतरी त्यांचे सारथ्याचे काम रंगा कुलकर्णी, अ‍ॅड. उमेश भोजने, संजय पवार, अ‍ॅड. सोपान शिंदे, संजय तिºहेकर, वामन शिंदे यांच्यासह असंख्य मंडळींने केले. सोलापुरात ही सातवी मोहीम पार पडली. 

टॅग्स :Solapurसोलापूर