शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

तब्बल ६ हजार फुटांवरुन मजेत झोका घेत होता, इतक्यात झोपाळा तुटला अन् कोसळल्या दरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 17:48 IST

दोन महिलांनी आपला जीव धोक्यात घातला. हजारो फूट उंचावर असलेल्या झोपाळ्याचा आनंद त्या लुटायला गेला आणि झोपाळाच (Women fall from swing) तुटला. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

झोपाळ्यावर बसून उंच उंच उडायला कुणाला आवडत नाही. प्रत्येकाला वाटतं आपण झोपाळ्यावर बसून उंच उडावं. पण काही लोकांना तर यापुढेही जाऊन उंचावर असलेल्या झोपाळ्यावर बसून अधिक उंच उडण्याची हौस असते. अशाच हौसेपोटी दोन महिलांनी आपला जीव धोक्यात घातला. हजारो फूट उंचावर असलेल्या झोपाळ्याचा आनंद त्या लुटायला गेला आणि झोपाळाच (Women fall from swing) तुटला. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

रशियातील 6000 फूट उंच डोंगरावर झोपाळा बांधण्यात आला आहे. या झोपाळ्यावर झुलण्यासाठी अनेक पर्यटक येतात. अशाच दोन महिलासुद्धा या झोपाळ्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून बसल्या. पण त्यांच्यासोबत अशी दुर्घटना घडली की कदाचित या डोंगरावरील काय साध्या जमिनीवरील झोपाळ्यावरही बसायची कदाचित हिंमत करणार नाही.

@ShockingClip ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता, अगदी डोंगराच्या कडेवर हा लांब आणि मोठा असा झोपाळा आहे. त्यावर दोन महिला अगदी उत्साहात बसतात. मागून त्यांना झोके देण्यासाठी एक व्यक्ती आहे. झोका देताच तो डोंगराच्या अगदी पुढे जातो म्हणजे झोपाळ्यावर झुलताना खाली पाहिलं तर खोल दरी आणि वर उंच आकाशात आणि त्याच्यामध्ये झोपाळ्यातून हवेत उडण्याचा अद्भुत आनंद आणि हो. सोबतच तितकी भीतीसुद्धा. ज्या भीतीचा आवाज या महिलांनी झोका घेताच स्पष्टपणे ऐकू येतोच. पण फक्त हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या काळजातूनही जाणवतो.

महिलांना झोके घेताना पाहून हा झोपाळा तुटला तर असा विचारही काही क्षण मनात येतो आणि हे काय! खरंच झुलता झुलता झोपाळा एका बाजूने तुटतो आणि झोपाळ्यावरील महिला धाडकन खाली कोसळतात. व्हिडीओ पाहून आपल्या काळजाची धडधडही वाढली. त्या महिलांचा काय झालं असेल, त्या काही वाचल्या नसतील. इतक्या उंचावरून पडून काय त्यांचा जीव वाचणार, अशीच भीती आपल्याही मनात निर्माण होते.

पण सुदैवाने  झोपाळा डोंगरापासून फार दूर नव्हता डोंगराच्या अगदी कडेवरच तुटला. जिथं काही अंतरावर खाली एक लाकडी प्लॅटफॉर्म होता, त्यावरच या महिला पडल्या. महिलांचं नशीब बलवत्तर म्हणून त्यामुळे महिलांचा जीव वाचला. त्यांना दुखापत झाली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर