Reel शूट करत होती महिला; तेवढ्यात बाईकस्वाराने हिसकावले मंगळसूत्र, video व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 21:26 IST2024-03-24T21:26:01+5:302024-03-24T21:26:40+5:30
याप्रकरणी महिलेने तक्रार दाखल केली आहे.

Reel शूट करत होती महिला; तेवढ्यात बाईकस्वाराने हिसकावले मंगळसूत्र, video व्हायरल...
chain snatching:उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून चेन स्नॅचिंगची अजब घटना समोर आली आहे. इंदिरापुरमच्या पॉश रस्त्यावर एक महिला मोबाईल मध्ये रील शूट करत होती. यावेळी चोराने महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून पोबारा केला. ही संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद झाली. या घटनेनंतर महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गाझियाबादच्या इंदिरापुरम पोलीस स्टेशन हद्दीतील ज्ञान खांड परिसरात सुषमा नावाची महिला रील शूट करत होती. यावेळी अचानक दुचाकीवरुन आलेल्या एका चोरट्याने महिलेच्या गळ्यातील चेन चोरुन पळ काढला. ही संपूर्ण मोबाईलमध्ये कैद झाली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
REEL के साइड इफैक्ट -
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) March 24, 2024
UP के जिला गाजियाबाद में एक महिला सड़क पर REEL बनवा रही थी। बाइक सवार बदमाश आया और चेन लूटकर फरार हो गया। pic.twitter.com/THRcfo8OiW
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @SachinGuptaUP नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, 'रीलचे दुष्परिणाम.' असे लिहिले आहे. अवघ्या 32 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 32 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईक करून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.