गो कोरोना! 'या' तरूणीने कोरोनाचं टेन्शन घालवण्यासाठी माधुरीच्या गाण्यावर लगावले ठुमके!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 11:40 IST2020-03-18T11:38:06+5:302020-03-18T11:40:33+5:30

फक्त कोरोना...कोरोना अन् कोरोना....या तणावाच्या वातावरणात एका तरूणीचा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

This woman from greece dances to Madhuri Dixit song to fight coronavirus stress api | गो कोरोना! 'या' तरूणीने कोरोनाचं टेन्शन घालवण्यासाठी माधुरीच्या गाण्यावर लगावले ठुमके!

गो कोरोना! 'या' तरूणीने कोरोनाचं टेन्शन घालवण्यासाठी माधुरीच्या गाण्यावर लगावले ठुमके!

सध्या सगळीकडेच कोरोना व्हायरसची चर्चा ऐकायला मिळत आहे. आणि यामुळेच अनेकजण तणावात आहेत. हा तणाव यावरून दिसून येतो की, लोक दुसऱ्या कोणत्या विषयावर बोलतच नाहीयेत. फक्त कोरोना...कोरोना अन् कोरोना....या तणावाच्या वातावरणात एका तरूणीचा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

या व्हिडीओत एक तरूणी माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा तिचा डान्स पाहून कोरोनामुळे आलेला तुमचा तणान नक्कीच पूर्ण दूर होईल.

Mr_Belutsch नावाच्या ट्विटर पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. याला कॅप्शन देण्यात आलं आहे की, 'जेव्हा जगभरातील लोक कोरोनामुळे तणावात होते, तेव्हा माझी सहकारी Katerina Korosidou कामादरम्यान कोरोना व्हायरसचा स्ट्रेस दूर करण्यासाठी डान्स करत होती. Katerina ग्रीसची आहे आणि ती बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितची फॅन आहे. चला Katerina ला फेमस करू'.

हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत 30 हजारपेक्षा जास्त व्ह्यू या व्हिडीओला मिळाले आहेत. अनेकजण चांगल्या कमेंटही करत आहेत.


Web Title: This woman from greece dances to Madhuri Dixit song to fight coronavirus stress api