Video : देव तारी त्याला कोण मारी! ९व्या मजल्यावरून ती खाली पडली, उभी राहिली आणि चालत निघून गेली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 13:44 IST2020-01-27T13:40:17+5:302020-01-27T13:44:55+5:30

एका आश्चर्यकारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून यात एक महिला ९व्या मजल्यावरून खाली पडली.

Woman falls from 9th floor of apartment building in Russia viral video | Video : देव तारी त्याला कोण मारी! ९व्या मजल्यावरून ती खाली पडली, उभी राहिली आणि चालत निघून गेली!

Video : देव तारी त्याला कोण मारी! ९व्या मजल्यावरून ती खाली पडली, उभी राहिली आणि चालत निघून गेली!

एका आश्चर्यकारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून यात एक महिला ९व्या मजल्यावरून खाली पडली. काही वेळ ती तशीच पडून राहिली आणि नंतर आरामात चालत तिथून निघून गेली. जणू काही झालंच नाही. ही घटना एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना रशियातील असून पश्चिम सायबेरिया प्रांतातील एका शहरात घडली आहे. २२ जानेवारीला ही महिला इमारतीच्या ९व्या मजल्यावरून खाली पडली होती. सुदैवाने जमिनीवर बर्फ असल्याने तिला काही झाले नाही.

ट्विटरवर एका यूजरने हा व्हिडीओ २४ जानेवारीला शेअर केला. आतापर्यंत हा व्हिडीओ १९ हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आणि याला ४०० पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, खाली पडल्यावर महिला काही वेळातच लगेच उठून चालू लागली. थोड्या अंतरावर जाऊन तिने शेजाऱ्यांना अ‍ॅम्बुलन्स बोलवण्यास सांगितले. डॉक्टर म्हणाले की, तिला काही जखमा झाल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या वरून पडूनही तिची हाडे मोडली नाहीत. ती खाली कशी पडली याबाबत माहिती मिळू शकली नाही.


Web Title: Woman falls from 9th floor of apartment building in Russia viral video