Viral Video: पत्नी बॉयफ्रेंडसोबत दिसली कारमध्ये; पती गाडी थांबवायला गेला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 21:13 IST2025-01-16T21:12:21+5:302025-01-16T21:13:35+5:30
Moradabad Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. पत्नी बॉयफ्रेंडसोबत कारमधून फिरत असल्याचे पतीने पाहिले. त्यानंतर जे घडले. त्याचाच हा व्हिडीओ आहे.

Viral Video: पत्नी बॉयफ्रेंडसोबत दिसली कारमध्ये; पती गाडी थांबवायला गेला अन्...
Viral Video News: एक व्यक्ती रस्त्यावरून जात होता. त्यावेळी अचानक एका कारमध्ये त्याला त्याची पत्नी दिसली. पत्नी तिच्या बॉयफ्रेंडसोबत असल्याचे बघून हा व्यक्ती पळत त्या कारसमोर गेला. त्याने कार रोखण्याचा प्रयत्न केला. पण, पत्नीच्या बॉयफ्रेंडने गाडी थांबवलीच नाही. त्यानंतर जे घडलं, ते सगळं काहींनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या सगळ्या प्रकाराची माहिती समोर आली. हा व्यक्ती पत्नीला दुसऱ्या व्यक्तीच्या गाडीत बघून भडकला आणि कार थांबवायला गेला. पण, त्याच्या पत्नीच्या बॉयफ्रेंडने कारची गती वाढवली. त्यामुळे हा व्यक्ती कारच्या बोनट पडला. त्यानंतरही पत्नीच्या बॉयफ्रेंड कार थांबवलीच नाही. काही किमी अंतर पुढे गेल्यानंतर त्याने कार थांबवली. तोपर्यंत पती बोनटवर लटकलेला होता. कार थांबल्यानंतर पतीने पत्नीच्या बॉयफ्रेंडला पकडले.
पत्नीच्या बॉयफ्रेंडला अटक
याप्रकरणी त्या व्यक्तीने कटघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला अटक केली.
पत्नीच्या बॉयफ्रेंडचे नाव माहीर असे आहे. बोनटवर लटकलेल्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार, १५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास फिर्यादीने माहीरसोबत त्याच्या पत्नीला कारमध्ये बघितले. ते बघून त्याने कार थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, माहीर कार थांबवण्याऐवजी आणखी जोरात पळवली.
#Moradabad
— Ashish Mishra (@AshishMisraRBL) January 16, 2025
कार में प्रेमी संग जा रही थी बीवी, रोकने के लिए बोनट पर लटक गया पति, शहर में दौड़ती रही गाड़ी...#ViralVideospic.twitter.com/I5ODKQxZ8U
दोघांमध्ये झाली हाणामारी
त्यामुळे फिर्यादी व्यक्ती कारच्या बोनटवर अडकला. काही किमी अंतर दूर गेल्यानंतर माहीरने कार थांबवली. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. भांडण बघून लोक जमा झाले आणि अचानक झालेली गर्दी बघून पोलिसही घटनास्थळी आले.
मुरादाबादचे पोलीस अधीक्षक सी.टी. रणविजय सिंह यांनी सांगितले की, 'कटघर पोलीस ठाणे हद्दीत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तक्राराने आरोप केला आहे की, एक व्यक्ती त्याच्या पत्नीला कारमधून घेऊन जात होता. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने गाडी थांबवलीच नाही. बोनटवर असतानाही तो गाडी पुढे नेत राहिला. जेव्हा गाडी थांबली, तेव्हा त्याची पत्नी गाडीतून उतरून निघून गेली.'