Viral Video: तलाव पार करण्यासाठी तरूणीने तराफा समजून पाय पुढे टाकला अन् झाली फजिती; व्हिडीओ पाहून तुम्हाला आवरणार नाही हसू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 17:58 IST2022-03-19T17:57:14+5:302022-03-19T17:58:06+5:30
तुम्ही पाहिलात का धमाल विनोदी व्हिडीओ?

Viral Video: तलाव पार करण्यासाठी तरूणीने तराफा समजून पाय पुढे टाकला अन् झाली फजिती; व्हिडीओ पाहून तुम्हाला आवरणार नाही हसू
Comedy Viral Video: असं बरेचदा घडते की लोकांना काहीतरी वेगळे दिसते, तर प्रत्यक्षात ते वेगळेच असते. दुरून एखादी गोष्ट जशी दिसत असते, तशी ती खरोखर असेलच असं नाही. त्या गोष्टीच्या जवळ गेल्यावर त्याचा खरेपणा कळतो. झाडावर बसलेलं फुलपाखरू अनेकदा फुलासारखं वाटतं पण त्याला हात लावायला गेल्यावरच ते फूल नसून फुलपाखरू आहे असं समजतं. जगात अशा अनेक गोष्टी असतात, त्या तुमची फजिती करतात. असाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून तो व्हिडीओ पाहिल्यावर लोक अक्षरश: हसून लोटपोट होत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी चुकीचा अंदाज बांधते आणि त्यानंतर ती चांगलीच फजिती होते. असा मजेशीर व्हिडिओ तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी एका पातळ लाकडी पुलावरून तलावाच्या मधोमध येते. पाण्यात एक गोलाकार वस्तू तिला दिसते. ती वस्तू म्हणजे तराफ्यासारखा प्रकार असावा असं तिला वाटतं. ती त्या तराफ्यावर चढण्यासाठी पाय पुढे सरकवताच ती धपकन पाण्यात पडते. कारण तो तराफा नसून पाण्यावर असलेलं पानांचं आवरण असतं. पाहा तो धमाल व्हिडीओ-
हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर nihongo.wakaranai नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत २.२४ कोटी व्ह्यूज मिळाले असून तब्बल ५५ लाख लोकांनी व्हिडीओ लाईक केला आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.