FIFA World Cup 2022: व्वा बेटे.. मान गए! फुटबॉल वर्ल्ड कपमधला 'हा' Video पाहून तुम्हीही हेच म्हणाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 11:11 AM2022-11-23T11:11:04+5:302022-11-23T11:11:38+5:30

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर भाजपाच्या वरूण गांधी यांनीही कौतुक केले

viral video on social media bjp leader varun gandhi appreciates japan fans in fifa world cup 2022 qatar | FIFA World Cup 2022: व्वा बेटे.. मान गए! फुटबॉल वर्ल्ड कपमधला 'हा' Video पाहून तुम्हीही हेच म्हणाल

FIFA World Cup 2022: व्वा बेटे.. मान गए! फुटबॉल वर्ल्ड कपमधला 'हा' Video पाहून तुम्हीही हेच म्हणाल

Next

FIFA World Cup 2022, BJP Varun Gandhi: कतारमध्ये सुरू झालेला FIFA World Cup 2022 सध्या वादग्रस्त मुद्द्यांनी गाजतोय. सुरूवातीला वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईक यांना आमंत्रित केल्याने वाद उपस्थित झाला होता. त्यानंतर, इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात इराणच्या संघाने आपल्याच सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी सामन्याआधी राष्ट्रगीत गायले नाही. पाठोपाठ अर्जेंटिनाच्या एका महिला पत्रकाराची रिपोर्टिंग करताना बॅग चोरीला गेली आणि त्यानंतर एका अमेरिकन पत्रकाराला इंद्रधनुष्याचा शर्ट घातल्याने रोखण्यात आले. पण याच दरम्यान एक चांगला व्हिडिओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओतील तरूणांची कृती पाहून चक्क भाजपा नेते वरुण गांधी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

काही जपानी चाहते मॅचनंतर स्टेडियमची साफसफाई करण्यात व्यस्त असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना वरुण गांधी यांनी लिहिले की, एक देश आपली सांस्कृतिक ओळख दाखवत आहे. विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यानंतर जपानचे हे लोक जे काही करत आहेत, आपण सर्व देशभक्तांनीही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या सांस्कृतिक वारशाची संवेदनशीलता जपली पाहिजे. हा व्हिडिओ कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सामन्यानंतरचा आहे.

आपल्या संघाचा सामना नसतानाही केली साफसफाई

एका कतारी नागरिकाने हा व्हिडिओ बनवला आहे. यामध्ये जपानी चाहते स्टेडियममध्ये पडलेल्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे डबे उचलताना दिसले. काही लोक फरशी साफ करत होते. तेथे काही लोक कचरा गोळा करण्यासाठी पिशव्या घेऊन उभे होते. व्हिडिओ बनवणारा एक व्यक्ती अरबी भाषेत म्हणत होता, पाहा जपानी चाहते वर्ल्ड कपच्या उद्घाटनाच्या सामन्यानंतर साफसफाई करण्यात व्यस्त आहेत. विशेष म्हणजे हा त्यांच्या संघाचा सामनाही नव्हता.

व्हिडिओ बनवणारा कतारी पुरुष एका महिला चाहत्याकडे जातो आणि असे का करत आहात असे विचारतो. यावर ती म्हणते, जपानी लोक त्यांच्या मागे कधीच घाण सोडत नाहीत. आम्ही सर्व जागांचा आदर करतो आणि त्यांची देखभाल करण्याची आवड आहे. व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, जपानच्या लोकांनी जमिनीवर पडलेले झेंडेही गोळा केले आहेत. ते झेंडे खुर्चीवर ठेवतात किंवा काढून घेतात. या सर्व लोकांबद्दल त्याला आदर आहे. व्हिडिओच्या शेवटी, तो काही जपानी चाहत्यांना मिठी मारतो. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर खूप पाहिला जात आहे.

Web Title: viral video on social media bjp leader varun gandhi appreciates japan fans in fifa world cup 2022 qatar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.