Funny Video: व्हड पाच्ची! तरूणाला आकाशात दिसला चुकीचा तारा, फोन करून पोलिसांना बोलवलं आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 12:04 PM2021-02-12T12:04:32+5:302021-02-12T12:14:47+5:30

Funny Viral Video : पोलीस आणि या व्यक्तीच्या संवादाचा हा मजेदार व्हिडीओ(Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झाला आहे. सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Viral video of a man dialling police helpline number 112 after finding wrong star in the sky | Funny Video: व्हड पाच्ची! तरूणाला आकाशात दिसला चुकीचा तारा, फोन करून पोलिसांना बोलवलं आणि....

Funny Video: व्हड पाच्ची! तरूणाला आकाशात दिसला चुकीचा तारा, फोन करून पोलिसांना बोलवलं आणि....

Next

Viral Video : जनतेच्या सोयीसाठी सरकारने हेल्पलाइन नंबर (Police Helpline Number) जारी केला आहे. हा नंबर २४ तास अॅक्टिव राहतो आणि लोक यावर फोन करून कधीही त्यांची समस्या सांगू शकतात. समस्या म्हणजे कुणासोबत काही चुकीचं घडत असेल किंवा काही दुर्घटना झाली असेल तर कॉल करून पोलिसांना सूचना देऊ शकता. मात्र, एका व्यक्तीने पोलीस हेल्पलाइन नंबर ११२ वर कॉल करून आकाशातील एका गडबडीची सूचना दिली.

पोलीस आणि या व्यक्तीच्या संवादाचा हा मजेदार व्हिडीओ(Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झाला आहे. सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. यात नशेत असलेली एक व्यक्ती पोलिसांना आकाशात होत असलेल्या विचित्र हालचालीची माहिती देत आहे. या व्यक्तीने पोलीस हेल्पलाइन नंबर ११२ वर कॉल करून त्यांना लगेच बोलवलं होतं. (हे पण वाचा : अद्भूत! आकाशातून अशी दिसते भारत-पाकिस्तान बॉर्डर, बघा न पाहिलेला शानदार नजारा!)

जेव्हा पोलीस त्याच्याजवळ पोहोचले तेव्हा त्याने आकाशाकडे इशारा करत सांगितले की, त्याला एका ताऱ्याबाबत काहीतरी गडबड झाल्याचं वाटत आहे. या व्यक्तीनुसार, आकाशातील सर्व तारे ठीक होते. पण एक तारा सतत लूकलूक करत होता. (हे पण वाचा : कमालच केली राव! पहिल्या रात्री बायको बघत होती वाट; अन् हा पठ्ठ्या बसला काम करत, लोक म्हणाले....)

तारा उतरवण्याची मागणी

आश्चर्याची बाब म्हणजे फोनवरून अशी विचित्र तक्रार मिळाल्यावरही पोलीस या व्यक्तीकडे गेले. पोलिसांनीही त्याला चिमटा काढत त्याला हा तारा खाली उतरवण्याची पद्धत विचारली. त्यांनी या व्यक्तीला विचारले की, काहीतरी गडबड वाटत असलेल्या ताऱ्याला दोरीच्या मदतीने खाली उतरवता येईल का? यावर ती व्यक्ती म्हणाली की, तुम्हीच त्याला खाली उतरवा. 

सोशल मीडिया यूजरने घेतली मजा

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड होताच इंटरनेट यूजर्सनी त्यावर भरभरून कमेंट्स केल्या. लोकांनी लिहिले की, या व्यक्तीने जे केलं ते केलं, पण पोलिसही तिथे पोहोचले. तर काही लोक म्हणाले की, इतक्या जागरूक व्यक्तीला १-२ तारे तर मिळायलाच हवे. तर काही लोकांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे.
 

Web Title: Viral video of a man dialling police helpline number 112 after finding wrong star in the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.