शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: 'धुरंधर' फिव्हर सुरूच! चिमुरडीचा FA9LA गाण्यावरील जबरदस्त डान्स सोशल मीडियावर VIRAL

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:04 IST

Small Girl Dance on FA9LA viral song: अक्षय खन्नाच्या सिग्नेचर स्टेप्स छोट्या मुलीने इतक्या मस्त केल्या आहेत की, नेटकरी तिचे कौतुक करत आहेत.

Small Girl Dance on FA9LA viral song: बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या त्याच्या 'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील अक्षय खन्नाची एन्ट्री आणि त्यातील 'FA9LA' हे गाणे इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. अक्षय खन्नाच्या 'रेहमान डकैत' या पात्राने आणि त्याच्या हटके डान्स स्टेप्सनी चाहत्यांना वेड लावले असतानाच, आता एका चिमुरडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या चिमुरडीने अक्षय खन्नाच्या सिग्नेचर स्टेप्स इतक्या मस्त केल्या आहेत की, नेटकरी तिचे कौतुक करत आहेत.

चिमुरडीचा भन्नाट डान्स

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी 'धुरंधर' चित्रपटातील प्रसिद्ध 'FA9LA' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यात अक्षय खन्ना ज्याप्रमाणे शांतपणे आणि एका विशिष्ट स्वॅगमध्ये डान्स करतो, अगदी तशाच स्टेप्स करत ही चिमुरडी डान्स करताना दिसते. तिचे हावभाव आणि आत्मविश्वासाने भरलेल्या डान्स स्टेप्स पाहून अनेकांनी तिची तुलना खुद्द अक्षय खन्नाशी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. पाहा व्हिडीओ-

सोशल मीडियावर 'FA9LA'ची क्रेझ

बहारिनचा गायक 'फ्लिपरॅची' याने गायलेले हे गाणे सध्या इन्स्टाग्राम रिल्सवर ट्रेंडिंग आहे. अक्षय खन्नाचा या गाण्यावरील डान्स कोणताही सराव न करता 'ऑन द स्पॉट' केल्याचे बोलले जात आहे. यामुळेच या गाण्याला एक वेगळीच नॅचरल वाईब मिळाली आहे. या चिमुरडीच्या व्हिडिओने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, लहान मुलांमध्येही कलागुणांची कमतरता नाही आणि त्यांना बॉलीवूडच्या ट्रेंडची चांगलीच जाण आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणत आहेत की, ही चिमुरडी तर अक्षय खन्नालाही मागे टाकेल! काहींनी तिला 'छोटी रेहमान डकैत' असेही संबोधले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Little girl's 'FA9LA' dance goes viral, 'Dhurandhar' fever grips internet.

Web Summary : A young girl's dance to 'FA9LA' from 'Dhurandhar' is trending. Her impressive moves mirroring Akshay Khanna's signature style, have captivated social media users, drawing comparisons and praise for her talent.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलDhurandharधुरंधर सिनेमाAkshaye Khannaअक्षय खन्नाViral Videoव्हायरल व्हिडिओ