VIRAL : मृत्यूशी झुंज देणाऱ्या कर्मचाऱ्याला सुटी नाकारली; निर्दयी कंपनीच्या वागणुकीमुळे त्याने लाखोंची नोकरी सोडली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:20 IST2026-01-30T18:19:50+5:302026-01-30T18:20:31+5:30

मेंदूच्या कर्करोगाशी लढणाऱ्या टायलर वेल्स या कर्मचाऱ्याला उपचारासाठी रजा हवी होती, मात्र कंपनीने ती देण्यास नकार दिला.

VIRAL: Employee fighting death denied leave; He quits his job worth lakhs due to ruthless company treatment! | VIRAL : मृत्यूशी झुंज देणाऱ्या कर्मचाऱ्याला सुटी नाकारली; निर्दयी कंपनीच्या वागणुकीमुळे त्याने लाखोंची नोकरी सोडली!

VIRAL : मृत्यूशी झुंज देणाऱ्या कर्मचाऱ्याला सुटी नाकारली; निर्दयी कंपनीच्या वागणुकीमुळे त्याने लाखोंची नोकरी सोडली!

"आमच्या कंपनीत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिले जाते, येथे 'अनलिमिटेड पेड लीव्ह'ची सुविधा आहे," अशा जाहिराती करणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांचा खरा चेहरा एका घटनेमुळे समोर आला आहे. मेंदूच्या कर्करोगाशी लढणाऱ्या टायलर वेल्स या कर्मचाऱ्याला उपचारासाठी रजा हवी होती, मात्र कंपनीने ती देण्यास नकार दिला. अखेर हताश झालेल्या टायलरने आपल्या लाखोंच्या पॅकेजवर पाणी सोडत राजीनामा दिला. टायलरची ही व्यथा सोशल मीडियावर व्हायरल झाली असून जगभरातून संताप व्यक्त होत आहे.

कीमोथेरपी सुरू असतानाही कामाचा तगादा

टायलर वेल्स एका नामांकित जाहिरात कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होता. जेव्हा त्याला ब्रेन कॅन्सर झाल्याचे निदान झाले, तेव्हा त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. उपचारांदरम्यान होणाऱ्या कीमोथेरपीमुळे त्याला प्रचंड थकवा आणि वेदना होत असत. अशा स्थितीत त्याने कंपनीकडे महिन्यातील काही दिवस रजेची मागणी केली. मात्र, ज्या कंपनीत 'अनलिमिटेड पेड लीव्ह'चे धोरण होते, त्याच कंपनीच्या व्यवस्थापनाने त्याला धक्कादायक उत्तर दिले.

कंपनीचा निर्दयीपणा: "पगार हवा असेल तर काम करा"

टायलरने सांगितल्यानुसार, व्यवस्थापनाने त्याच्या आजारपणाला सुट्यांच्या नियमांचा गैरवापर ठरवले. कंपनीने त्याला स्पष्टपणे सांगितले की, "जर उपचार घ्यायचे असतील, तर पगाराशिवाय घरी बसा. पगार हवा असेल तर कामावर यावेच लागेल." इतकेच नाही तर, आजारपणामुळे कामाचा ताण थोडा कमी करण्याची त्याची विनंतीही कंपनीने फेटाळून लावली. एका बाजूला मृत्यूशी संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला कंपनीचा जाच, अशा कात्रीत टायलर सापडला होता.

सोशल मीडियावर संतापाची लाट

अखेर या छळाला कंटाळून टायलरने नोकरीचा राजीनामा दिला आणि आपली आपबिती एक्स अकाऊंटवर शेअर केली. या पोस्टवर नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. "कॉर्पोरेट जगासाठी कर्मचारी म्हणजे केवळ एक मशीन आहे का?" असा सवाल विचारला जात आहे. "जेव्हा एखादी व्यक्ती जगण्यासाठी संघर्ष करत असते, तेव्हा तिच्यावर आर्थिक आणि मानसिक दडपण आणणे ही माणुसकी नाही," अशी कमेंट एका युजरने केली आहे.

ही घटना म्हणजे कॉर्पोरेट संस्कृतीतील 'वर्क-लाईफ बॅलन्स'च्या दाव्यांमागचे काळे सत्य असल्याचे बोलले जात आहे. टायलरच्या या हिमतीला अनेकांनी दाद दिली असून अशा शोषण करणाऱ्या कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे.

Web Title : कैंसर से जूझ रहे कर्मचारी को कंपनी ने छुट्टी नहीं दी, नौकरी छोड़ी।

Web Summary : कैंसर के इलाज के लिए छुट्टी न मिलने पर टायलर वेल्स ने अपनी उच्च वेतन वाली नौकरी छोड़ दी। कंपनी की कठोर नीति से ऑनलाइन आक्रोश फैल गया। कीमोथेरेपी के दौरान उन्हें भारी दबाव का सामना करना पड़ा, जो कर्मचारी स्वास्थ्य के प्रति कॉर्पोरेट असंवेदनशीलता को दर्शाता है।

Web Title : Company denies leave to cancer-stricken employee, he quits job.

Web Summary : Denied leave for cancer treatment, Tyler Wells resigned from his high-paying job. The company's rigid policy sparked outrage online. He faced immense pressure during chemotherapy, highlighting corporate insensitivity towards employee health.