Video: एका गाडीवर पाच तरुण, पोलिसांनी अशी घडवली अद्दल की पुन्हा हिंमत होणार नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 11:17 IST2025-12-24T11:16:54+5:302025-12-24T11:17:48+5:30
Viral Video: सोशल मीडियावर लक्ष वेधून घेण्यासाठी तरुण व्हिडीओ बनवतात. जीवघेणे स्टंटही करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. त्यांना इतका दंड ठोठावलाय की पुन्हा हिंमतच होणार नाही.

Video: एका गाडीवर पाच तरुण, पोलिसांनी अशी घडवली अद्दल की पुन्हा हिंमत होणार नाही?
एका गाडीवरून तब्बल पाच तरूण प्रवास करत आहेत. तिघे सीटवर बसले आहेत. एक पाठीमागे सामान बांधायच्या ठिकाणी, तर एक तरुण चक्क पाय ठेवतो तिथे उभा आहे. हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांनी वाहतूक नियमांनाच वाकुल्या दाखवल्या. पण, पोलिसांनी त्यांना शोधलं आणि असा दंड ठोठावला की, परत त्यांची असं करण्याची हिंमतही होणार नाही.
ही घटना घडली आहे हापुडमध्ये. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील पिलखुवा तालुक्यातील आहे. व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की पाचही तरुण स्टंट करण्याच्या नादात किती जीवघेणा प्रवास करत आहे.
एक मोटारसायकल आणि पाच तरुण या व्हिडीओमध्ये दिसत आहे. एक तरुण तर चक्क दुचाकीवर बसल्यानंतर पाय ठेवतात त्या जागेवर उभा आहे. दुचाकी चालवताना तोल गेला असता तर पाचही तरुण पडले असते. पण आजूबाजूने जाणाऱ्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला असता. सुदैवाने असं काही घडलं नाही.
#Hapur
— News1India (@News1IndiaTweet) December 24, 2025
युवकों को नहीं है कानून का कोई खौफ!
बाइक सवार युवकों द्वारा स्टंटबाजी का वीडियो वायरल
कोतवाली पिलखुवा में जमकर उड़ाई जा रही है नियम की धज्जियां
1 बाइक पर पांच द्वारा यातायात नियमों की उड़ाई गई धज्जियां
वीडियो वायरल होने पर नींद से जागा ट्रैफिक महकमा
बाइक सवार… pic.twitter.com/d0OhIJEfa2
पोलिसांनी किती दंड ठोठावला?
तरुणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर एका व्यक्तीने पोस्ट केला. त्यानंतर हापुड पोलिसांनी चक्रे फिरवली आणि मोटारसायकलच्या मालकाला शोधलं.
वाहतूक पोलीस छवी राम यांनी या घटनेबद्दल सांगितलं की, सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला तरुण धोकादायक पद्धतीने दुचाकी चालवल्याबद्दलची माहिती मिळाली होती. पोलिसांनी मोटारसायकलची माहिती घेतली आणि ३१ हजार रुपये दंड ठोठावला आहे.