VIDEO : नवरदेवाला स्टेजवर एकटंच सोडून तावातावाने निघून गेली नवरी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 15:44 IST2024-09-21T15:19:29+5:302024-09-21T15:44:06+5:30

Viral Video : कमेंट्समध्ये अनेकांनी असा दावा केला की, नवरदेव दारू पिऊन होता म्हणून नवरी निघून गेली. 

VIDEO: Bride leaves groom on the wedding stage know the reason | VIDEO : नवरदेवाला स्टेजवर एकटंच सोडून तावातावाने निघून गेली नवरी आणि मग...

VIDEO : नवरदेवाला स्टेजवर एकटंच सोडून तावातावाने निघून गेली नवरी आणि मग...

Viral Video : लग्नातील वेगवेगळे अजब व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या असाच एक अवाक् करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात नवरी नवरदेवाला स्टेजवर एकटं सोडून तावातावाने निघून जात असल्याची दिसत आहे. तर त्यावर नवरदेवानेही फार काही चिंता व्यक्त केली नाही. कमेंट्समध्ये अनेकांनी असा दावा केला की, नवरदेव दारू पिऊन होता म्हणून नवरी निघून गेली. 

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, स्टेज सजलेला आणि वर नवरी-नवरदेव उभे आहेत. समोर भरपूर पाहुणे आहेत. तेव्हाच अचानक नवरी तिची ओढणी काढत स्टेजवरून खाली उतरते आणि निघून जाते. यावेळी नवरदेवाने 'जायचं तर जा' असे हातवारे केले. नवरी खाली जाऊन वडिलांजवळ किंवा भावाजवळ रडताना दिसत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर मनजीत नावाच्या व्यक्तीने पोस्ट केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाइक्स मिळाले आहेत. एका तरूणीने कमेंट केली की, "हे तेच लग्न आहे ज्यात नवरदेव दारू पिऊन होता. प्रत्येकवेळी मुलीच चुकीचं वागत नाहीत". 

दुसऱ्या एका यूजरने लिहिलं की, "नक्कीच काहीतरी कारण असेल म्हणून नवरी निघून गेली. नाही तर मुली आपल्या आई-वडिलांच्या अब्रूसाठी काहीही करतात". जास्तीत जास्त लोकांनी नवरीचं कौतुक केलं आहे. 

Web Title: VIDEO: Bride leaves groom on the wedding stage know the reason