Video : आर्टिस्टने भिंतीवर रंग फेकून-फेकून तयार केला व्यक्तीचा चेहरा, बघाल तर व्हाल थक्क....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 12:58 IST2019-10-16T12:57:59+5:302019-10-16T12:58:42+5:30

वेगवेगळ्या कलाकारांच्या कलाकृती सोशल मीडियात नेहमीच व्हायरल होत असतात. काही कलाकार असे असतात ज्यांची कला पाहून थक्क व्हायला होतं.

Video: Artist creates portrait of man flicking paint on the wall | Video : आर्टिस्टने भिंतीवर रंग फेकून-फेकून तयार केला व्यक्तीचा चेहरा, बघाल तर व्हाल थक्क....

Video : आर्टिस्टने भिंतीवर रंग फेकून-फेकून तयार केला व्यक्तीचा चेहरा, बघाल तर व्हाल थक्क....

वेगवेगळ्या कलाकारांच्या कलाकृती सोशल मीडियात नेहमीच व्हायरल होत असतात. काही कलाकार असे असतात ज्यांची कला पाहून थक्क व्हायला होतं. काही कधीही आणि काहीही करू शकतात. अशाच एका आर्टिस्टचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर या व्हिडीओला भरपूर पसंत केलं जात आहे.

या आर्टिस्टचा कारनामा तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. या व्हिडीओत एक व्यक्ती हातांमध्ये रंगाची प्लेट घेऊन उभा आहे. आणि त्याच्या समोरा-समोर आर्टिस्ट उभा आहे. आर्टिस्ट बाजूला भींतीवर लावलेल्या कॅनव्हासवर रंग फेकून-फेकून समोरच्या व्यक्तीचा चेहरा तयार केलाय.

हा व्हिडीओ आर्टिस्टने त्याच्या BOU BOU या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. त्यासोबतच  @angadadlakha नावाच्या एका ट्विटर यूजरने हा व्हिडीओ ट्विट केलाय. ज्यानंतर हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एडिट केलेला असला तरी या आर्टिस्टची कला मात्र सर्वांनाच पसंत पडत आहे.


Web Title: Video: Artist creates portrait of man flicking paint on the wall