Republic Day 2026: घराच्या बाल्कनीत फडकला 'तिरंगा'.. कुठला आहे फोटो? का ठरतोय चर्चेचा विषय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 14:17 IST2026-01-26T14:10:46+5:302026-01-26T14:17:30+5:30

Jammu Kashmir Tricolor India Flag, Republic Day 2026: देशभरात विविध कार्यक्रम सुरु, त्यातच या फोटोची रंगलीये चर्चा

republic day 2026 jammu kashmir father of terrorist abid ramzan sheikh hoisted tricolor tiranga indian flag social media | Republic Day 2026: घराच्या बाल्कनीत फडकला 'तिरंगा'.. कुठला आहे फोटो? का ठरतोय चर्चेचा विषय?

Republic Day 2026: घराच्या बाल्कनीत फडकला 'तिरंगा'.. कुठला आहे फोटो? का ठरतोय चर्चेचा विषय?

Jammu Kashmir Tricolor India Flag, Republic Day 2026: संपूर्ण भारत देश आज ७७वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतो आहे. देशाच्या विविध भागात प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम होत आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्येही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून येत आहे. छोटीपोरा शोपियान येथील रहिवासी आणि A++ कॅटेगरीत असलेला सक्रिय दहशतवादी आबिद रमजान शेख याचे कुटुंब विशेषतः चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे त्याच्या वडिलांनी त्याच्या घरी राष्ट्रध्वज फडकवला आहे.

घटनेची का होतेय चर्चा?

दहशतवादी आबिद रमजान शेखच्या वडिलांनी राष्ट्रध्वज फडकवल्याची चर्चा होत आहे. कारण गेल्या महिनाभरापासून काश्मीर खोऱ्यात सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरू आहेत. अलिकडेच एका ग्रेनेड हल्ल्यात आठ सैनिक जखमी झाले होते. अशा वेळी ध्वज फडकवण्याचे अनेक अर्थ लावले जात आहेत. दहशतवाद्याच्या वडिलांनी ध्वज फडकवला हे वेगळ्या स्वरूपाचा संदेश म्हणून पाहिले जात आहे. तथापि, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दहशतवादी आबिद बऱ्याच काळापासून सक्रिय

दहशतवादी आबिद हा बऱ्याच काळापासून खोऱ्यात सक्रिय आहे. दक्षिण काश्मीरमधील अनेक घटनांमध्ये त्याचा थेट सहभाग आहे. म्हणूनच त्याला सुरक्षा एजन्सींनी 'मोस्ट वॉन्टेड' दहशतवादी म्हणून सूचीबद्ध केले आहे. सुरक्षा पथके बऱ्याच काळापासून त्याचा शोध घेत आहेत.

लाल चौकातही तिरंगा फडकला...

प्रजासत्ताक दिनानिमित्त जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथील लाल चौकात तिरंगा फडकवण्यात आला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पर्यटक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. त्यांनी तिरंगा फडकवून देशभक्तीची भावना दाखवली. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. केवळ काश्मीरच नाही तर खोऱ्यातील प्रत्येक भागात कडक नजर ठेवण्यात आली आहे.

Web Title : गणतंत्र दिवस: आतंकवादी के पिता ने फहराया तिरंगा, कश्मीर में देशभक्ति की लहर।

Web Summary : गणतंत्र दिवस पर, कश्मीर में एक आतंकवादी के पिता ने भारतीय ध्वज फहराया, जिससे तनाव के बीच चर्चा छिड़ गई। इस कृत्य को एक महत्वपूर्ण संदेश के रूप में देखा जा रहा है, जबकि श्रीनगर के लाल चौक सहित पूरी घाटी में सुरक्षा कड़ी है, जहाँ तिरंगा भी फहराया गया।

Web Title : Republic Day: Terrorist's Father Hoists Tricolor, Kashmir Abuzz With Patriotism.

Web Summary : On Republic Day, a terrorist's father in Kashmir hoisted the Indian flag, sparking discussions amidst ongoing tensions. The act is seen as a significant message, while security remains tight across the valley, including Srinagar's Lal Chowk, where the tricolor was also raised.