बाबो! 'हे' व्हायरल फोटो पाहिल्यावर बसेल तुम्हाला धक्का अन् म्हणाल, गोलमाल हैं भाई सब गोलमाल हैं....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 12:31 PM2020-06-01T12:31:32+5:302020-06-01T12:37:39+5:30

इंटरनेटचं विश्व किती कमालीचं आहे हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. त्याहून भन्नाट आहे सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म. ...

Real life vs social media see shocking pictures of Chinese social media stars api | बाबो! 'हे' व्हायरल फोटो पाहिल्यावर बसेल तुम्हाला धक्का अन् म्हणाल, गोलमाल हैं भाई सब गोलमाल हैं....

बाबो! 'हे' व्हायरल फोटो पाहिल्यावर बसेल तुम्हाला धक्का अन् म्हणाल, गोलमाल हैं भाई सब गोलमाल हैं....

googlenewsNext

इंटरनेटचं विश्व किती कमालीचं आहे हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. त्याहून भन्नाट आहे सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म. यावर लोक रातोरात स्टार होतात. लोक रोज लाखो फोटो आणि व्हिडीओ यावर शेअर करत असतात. पण फोटो शेअर करण्याआधी लोक अनेक प्रकारचे फोटो एडिटींग टूल्स आणि फिल्टर वापरतात. याने खऱ्या आणि समोर दिसणाऱ्या फोटोत बदल दिसतो. हे नेमकं कसं होतं याचा पुरावा असणारे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

या चीनी सोशल मीडिया स्टार्सचे हे फोटो Ex Treme या फेसबुक पेजवर 21 मे रोजी शेअर करण्यात आले होते. जे सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेत. या फोटोत चीनच्या दोन सोशल मीडिया स्टार्स आहेत. त्यांच्या या फोटोंनी अनेकांचे डोळे उघडले आहेत.

म्हणजे त्यांनी या फोटोंच्या माध्यमातून हे दाखवले आहे की, त्या तेव्हा कशा दिसतात जेव्हा त्यांचे फोटो एडीट करत नाहीत.

बसला ना धक्का? तुमच्याप्रमाणे अनेकांना ही रिअॅलिटी पाहून धक्का बसला. या फोटोंवर आतापर्यंत 5.7 हजार रिअॅक्शन्स, 18 हजार शेअर आणि 11 हजार कमेंट्स आल्या आहेत.

Web Title: Real life vs social media see shocking pictures of Chinese social media stars api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.