लग्नात नवरीला झोप आवरेना..; चक्क विधी सुरू असतानाच डुलकी घेतली, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 12:01 PM2023-12-26T12:01:03+5:302023-12-26T12:02:31+5:30

भर लग्न मंडपात झोप अनावर झाल्याने नवरी चक्क डुलक्या घेऊ लागल्याने वऱ्हाड्यांमध्ये एकच हशा पिकला. 

Rajasthan wedding video of bride falls asleep during her wedding rituals video goes viral on social media  | लग्नात नवरीला झोप आवरेना..; चक्क विधी सुरू असतानाच डुलकी घेतली, Video व्हायरल

लग्नात नवरीला झोप आवरेना..; चक्क विधी सुरू असतानाच डुलकी घेतली, Video व्हायरल

Viral Video : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. अन् तो क्षण अविस्मरणीय होण्याकरिता प्रत्येक जण कसोशीने प्रयत्न करत असतो. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ याला अपवाद ठरलाय. या व्हिडीओमध्ये नवरीने असं काही केलंय की लग्नातील हा क्षण तिच्या कायम स्मरणात राहील, सोबतच हा प्रसंग इतरांच्याही चर्चेचा विषय ठरेल.

सध्या सोशल मीडियावर राजस्थानातील एका लग्नाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर एकच हास्यकल्लोळ सुरू झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरी भर मंडपात घोरताना दिसतेय. एकीकडे लग्नविधी सुरू असताना डोक्यावर पदर घेऊन बसलेल्या नववधूला झोप अनावर झाली. त्यामुळे लग्नाचे विधी सुरू असताना ती झोपी गेल्याचे, व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. 

लग्नाचे विधी सुरू असताना नवरा आणि नवरी दोघे यज्ञकुंडाजवळ बसलेले दिसत आहेत. पण डोक्यावर पदर घेऊन बसलेली नवरी निद्राधीन झाल्याचे दिसत आहे. हा सगळा प्रकार नवरदेवाच्या लक्षात आल्यानंतर तो तिला हळूच खुणावताना दिसत आहे. त्यानंतर नवरी झोपेतून जागी होते. 

हा व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. शिवाय या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहेत. हा क्षण नवरीच्या कायम लक्षात राहील,  अशी एक मिश्किल प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.

पाहा व्हिडीओ :

Web Title: Rajasthan wedding video of bride falls asleep during her wedding rituals video goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.