शांत उभ्या असलेल्या बैलाला या आजोबांनी उगाचच दिले रट्टे, अहो खेळ अंगाशी आला ना राव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 18:33 IST2021-12-16T18:30:57+5:302021-12-16T18:33:58+5:30
बऱ्याचदा माणूस संकटं ही स्वत: हून अंगावर ओढावून घेतो. याचाच प्रत्यय देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शांत उभ्या असलेल्या बैलाला या आजोबांनी उगाचच दिले रट्टे, अहो खेळ अंगाशी आला ना राव!
एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हाला ‘आला अंगावर, घेतला शिंगावर’ हे वाक्य नक्कीच आठवेल. बऱ्याचदा माणूस संकटं ही स्वत: हून अंगावर ओढावून घेतो. याचाच प्रत्यय देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये एक बैल भिंतीच्या कडेला शांतपणे उभा असल्याचं दिसतं. समोर २ मुलंही बसल्याचं या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. तेवढ्यात एक म्हातारा तिथं काठी घेऊन येतो, आणि बैलाच्या मागे जाऊन त्याच्या पाठीत काठीचे ३-४ जोरदार वार करतो. आता असं केल्यानंतर बैल पळून जाईल असं या म्हाताऱ्याला वाटलं असेल, पण, झालं उलटंच. हा बैल चिडतो, आणि काठीने मारणाऱ्या म्हाताऱ्याला थेट शिंगांवर घेतो.
नशिबाने या घटनेवेळी जवळच दोन तरुणही तिथंच बसलेले होते, ही घटना घडल्यानंतर त्यांनी धावत जाऊन म्हाताऱ्याला वाचवलं, हा सगळा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लोक यावर भरभरुन कमेंट्स करत आहेत.
इसे कहते हैं जैसे को तैसा pic.twitter.com/6JlKBZy6Y1
— @StunnedVideo (@kumarayush084) December 15, 2021
हा व्हिडिओ पाहून नक्कीच म्हणता येईल की कोणत्याही प्राण्याला त्रास होऊ नये. भारतात प्राण्यांवर अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. गेल्या वर्षी केरळमध्ये काही खोडकर लोकांनी फटाक्यांनी भरलेले अननस गर्भवती हत्तीणीला खाऊ घातलं, त्यानंतर हत्तीणीचा मृत्यू अत्यंत वेदनादायक पद्धतीने झाला होता.