Viral Video: आता पॉपकॉर्न खाण्याआधी १०० वेळा विचार कराल, विक्रेत्याचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:10 IST2026-03-11T15:07:27+5:302026-03-11T15:10:56+5:30

Mumbai Viral Video: मुंबईतील रस्त्यावर पॉपकॉर्न विकणाऱ्या एका विक्रेत्याचा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Now you'll think 100 times before eating popcorn, the vendor's dirty deed was caught on camera! | Viral Video: आता पॉपकॉर्न खाण्याआधी १०० वेळा विचार कराल, विक्रेत्याचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद!

Viral Video: आता पॉपकॉर्न खाण्याआधी १०० वेळा विचार कराल, विक्रेत्याचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद!

मुंबईतील रस्त्यावर पॉपकॉर्न विकणाऱ्या एका विक्रेत्याचा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, नेटिझन्समध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

News9 या एक्स हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे, हा पॉपकॉर्न विक्रेता रस्त्याच्या कडेला उघड्यावर लघवी करण्यासाठी जातो. मात्र, त्यानंतर कोणताही संकोच न बाळगता किंवा हात न धुता, तो थेट आपल्या स्टॉलवर परततो. धक्कादायक बाब म्हणजे, स्टॉलवर येताच तो त्याच अस्वच्छ हातांनी पॉपकॉर्न पिशव्यांमध्ये भरण्यास सुरुवात करतो. काही वेळातच तिथे आलेल्या एका ग्राहकाला तो त्याच हातांनी पॉपकॉर्न विकतानाही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. "स्थानिक विक्रेत्यांना पाठिंबा देणे चांगलेच आहे, पण आरोग्याशी होणारी अशी तडजोड चालेल का?" असा प्रश्न विचारला जात आहे. अनेक युजर्सनी व्हिडिओसोबत कॅप्शन दिले आहे की, महागड्या ब्रँडपेक्षा स्थानिक विक्रेत्यांना पाठिंबा देण्याचा सल्ला दिला जातो, पण अशा कृत्यांमुळे विश्वासाला तडा जात आहे.

या घटनेमुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी स्वच्छतेचे कडक नियम असावेत. नियमित तपासणी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर अन्न विकणाऱ्यांच्या परवान्यांची तपासणी व्हावी, असा सूर उमटत आहे.

Web Title : पॉपकॉर्न विक्रेता कैमरे में कैद: खाने से पहले सौ बार सोचें!

Web Summary : मुंबई में एक पॉपकॉर्न विक्रेता खुले में पेशाब करते हुए और फिर हाथ धोए बिना पॉपकॉर्न पैक करते हुए कैमरे में कैद हुआ। इस घटना से सड़क किनारे मिलने वाले खाने की स्वच्छता पर सवाल उठ रहे हैं। नागरिकों ने नियमों और निरीक्षणों की मांग की।

Web Title : Popcorn Vendor's Unhygienic Act Caught on Camera; Think Before Eating!

Web Summary : A Mumbai popcorn vendor was filmed urinating in public, then packing popcorn without washing his hands. The act raises concerns about street food hygiene. Citizens demand stricter regulations and inspections.