करत होते वृद्धाची मस्करी, मग कहानी मे आया ट्वीस्ट, गमावल्या 'या' अत्यंत किमती वस्तू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 15:32 IST2021-08-13T12:19:27+5:302021-08-13T15:32:59+5:30
काहीवेळा उगीचच कुणालाही त्रास देणाऱ्या व्यक्तीचा डाव त्याच्यावरच उलटतो. बॉलीवुड सिमेमांमध्येही आपण पाहतो की सुरुवातीला व्हिलन जरी जिंकत असला तरी शेवटी जिंकतो तो हिरोच. या व्हिडिओमध्ये हा हिरो ठरलाय वृद्ध व्यक्ती...

करत होते वृद्धाची मस्करी, मग कहानी मे आया ट्वीस्ट, गमावल्या 'या' अत्यंत किमती वस्तू
काहीवेळा उगीचच कुणालाही त्रास देणाऱ्या व्यक्तीचा डाव त्याच्यावरच उलटतो. बॉलीवुड सिमेमांमध्येही आपण पाहतो की सुरुवातीला व्हिलन जरी जिंकत असला तरी शेवटी जिंकतो तो हिरोच. या व्हिडिओमध्ये हा हिरो ठरलाय वृद्ध व्यक्ती...
☺️☺️☺️😊😊 pic.twitter.com/ZxGTk1Ucd6
— Rupin Sharma IPS (@rupin1992) August 10, 2021
सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक असाच व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की एक वृद्ध व्यक्ती रस्त्यावरुन चालत आहे. इतक्यात एक युवक येतो व त्याची टोपी उडवतो. त्यानंतर त्याची टोपी मिळवण्यासाठी ती वृद्ध व्यक्ती त्याकडे विनंती करते तर तो युवक ती टोपी त्याच्या दोन साथीदारांकडे भिरकावतो. किती वेळ ते तिघेही त्या टोपीसोबत खेळत राहतात अन् वृद्ध व्यक्ती हताश होऊन बघत राहतो. काहीवेळाने तो वृद्ध व्यक्ती तिथून निघुन जातो आणि रस्त्याच्या कडेला बसतो. त्यानंतर तो खिशातून तीन मोबाईल काढतो जे त्या तिघांचे असतात.
या व्हिडिओमध्ये दिसतं, की झाडावर बसलेलं माकड हे सर्व पाहत असतं आणि ते जोरजोरानं हसू लागतं. ट्विटरवर शेअर केला गेलेला हा व्हिडिओ नेटकऱ्यांचं मनोरंजन करत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक करत यावर कमेंटही केल्या आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर (Twitter Video) आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा (IPS Rupin Sharma) यांनी शेअर केला आहे.