खान सरांचा ‘तो’ Video Viral, इराणबाबत सांगितली होती मोठी गोष्ट; आता खरी होताना दिसतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 19:29 IST2026-03-07T19:27:11+5:302026-03-07T19:29:48+5:30

Khan Sir Video Viral On Iran Nuclear Programme: खान सरांनी विद्यार्थ्यांना वर्गात शिकवताना इराणबाबत एक मोठी गोष्ट सांगितली होती. तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

khan sir video goes viral on social media a big thing about iran nuclear program which it seems to be coming true now | खान सरांचा ‘तो’ Video Viral, इराणबाबत सांगितली होती मोठी गोष्ट; आता खरी होताना दिसतेय

खान सरांचा ‘तो’ Video Viral, इराणबाबत सांगितली होती मोठी गोष्ट; आता खरी होताना दिसतेय

Khan Sir Video Viral On Iran Nuclear Programme: इराणविरोधातइस्रायल-अमेरिकेने सुरू केलेल्या युद्धात अमेरिकेने इराणशी कोणतीही चर्चा आता शक्य नसल्याचे स्पष्ट केले. आता कुठे युद्धास सुरूवात झाली आहे. इराणने बिनाशर्त शरण यावे अन्यथा युद्धाला सामोरे जावे असा स्पष्ट इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिला. परंतु, यावर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले आहे की, इराण कधीही शरणागती पत्करणार नाही. इराण कोणत्याही शेजारी देशावर हल्ला करणार नाही, जोपर्यंत तिथून हल्ला केला जात नाही. यातच आता खान सर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खान सरांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आपल्या वर्गात शिकवाना खान सर यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत मोठे भाष्य केले होते. खान सर यांचा हा व्हिडिओ इंस्टाग्राम, थ्रेड्स आणि इतर प्लॅटफॉर्मवर हजारो वेळा शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये खान सर इराणच्या अणुकार्यक्रमाबद्दल त्यांचे विचार स्पष्टपणे मांडताना पाहायला मिळत आहेत. जुलै २०२५ मधील हा जुना व्हिडिओ आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीमुळे तो पुन्हा शेअर केला जात आहे.

इराणने जाणूनबुजून अण्वस्त्रे विकसित करण्याची घाई केली नाही

व्हिडिओमध्ये खान सर विद्यार्थ्यांना असे सांगताना दिसत आहेत की, इराणने जाणूनबुजून अण्वस्त्रे विकसित करण्याची घाई केली नाही. इराणने आधीच अंदाजे ८० टक्के युरेनियम समृद्ध केले आहे. जर युरेनियमची पातळी ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत पोहोचली तर अणुबॉम्ब बनवणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होते. खान सरांचा अंदाज आहे की, जर इराणने असे करायचे ठरवले तर ते २०२९ पर्यंत पूर्ण क्षमतेचे अण्वस्त्र विकसित करू शकेल.

या एकाच कारणामुळे इराण थांबला आहे

व्हिडिओमध्ये खान सर असेही म्हणतात की, रशियाने इराणला अणुकार्यक्रम पुढे नेण्यापासून रोखले आहे. रशियाचे असे म्हणणे आहे की, युक्रेन युद्धातून आम्हाला मोकळे होऊ द्या. कारण, यावरून इराणवर संकट आले, तर रशिया वाचवायला येऊ शकणार नाही. या एकाच कारणामुळे इराण थांबला आहे, असे खान सर आपल्या व्हिडिओत म्हणत आहेत.

दरम्यान,  भारतासाठी इराण मित्र आहे, रशिया मित्र आहे आणि इस्रायलही मित्र आहे. या तीनपैकी एकाची निवड करायला सांगितली, तर तीनही आपले मित्र देश आहेत. पॅलेस्टाइनबाबत बोलायचे झाले तर, तेथील लोक ज्या दिवशी असे सांगतील की, काश्मीर पाकिस्तानचा भाग नाही. काश्मीर पूर्णपणे भारताचाच आहे. त्या दिवशी मी सांगतो की, पॅलेस्टाइनचे समर्थन केले जाईल, जे रशिया आणि पुतिन यांच्या पाठीशी आहोत. आपल्यासाठी राष्ट्र प्रथम आहे, असे खान सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.


Web Title : खान सर का वायरल वीडियो: ईरान की परमाणु महत्वाकांक्षाएं और अंतर्राष्ट्रीय संबंध

Web Summary : एक वायरल वीडियो में खान सर ईरान के परमाणु कार्यक्रम पर चर्चा करते हुए दिखाते हैं कि उसने हथियार-ग्रेड स्तर के पास यूरेनियम समृद्ध किया है। उनका सुझाव है कि रूस वर्तमान में यूक्रेन युद्ध के कारण ईरान को रोक रहा है। खान सर ईरान, रूस और इज़राइल के साथ भारत के मैत्रीपूर्ण संबंधों पर भी जोर देते हैं, जो सभी से ऊपर राष्ट्रीय हितों को प्राथमिकता देते हैं।

Web Title : Khan Sir's Viral Video: Iran's Nuclear Ambitions and International Relations

Web Summary : A viral video shows Khan Sir discussing Iran's nuclear program, revealing it has enriched uranium to near weapons-grade levels. He suggests Russia is currently restraining Iran due to the Ukraine war. Khan Sir also emphasizes India's friendly relations with Iran, Russia, and Israel, prioritizing national interests above all else.