हा माणूस आहे की रोबोट? ट्रम्प यांचे 'एअर फोर्स वन' जवळून गेले तरी चिनी सैनिक जागेवरून हलला नाही; पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 09:19 IST2026-05-14T09:17:27+5:302026-05-14T09:19:08+5:30
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून, विमानाची महाकाय बोईंग इंजिने जवळ असतानाही या अधिकाऱ्याने दाखवलेल्या संयमाने सर्वांना थक्क केले आहे.

हा माणूस आहे की रोबोट? ट्रम्प यांचे 'एअर फोर्स वन' जवळून गेले तरी चिनी सैनिक जागेवरून हलला नाही; पाहा व्हिडीओ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 'एअर फोर्स वन' विमान बीजिंगमध्ये उतरले. यावेळी विमानाचा प्रचंड आवाज असतानाही, ताठ उभा राहिलेला एक चिनी लष्करी अधिकारी सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून, विमानाची महाकाय बोईंग इंजिने जवळ असतानाही या अधिकाऱ्याने दाखवलेल्या संयमाने सर्वांना थक्क केले आहे. नेटकऱ्यांनी या सैनिकाच्या शिस्तीचे कौतुक केले असून, काहींनी यावर मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.
एका सोशल मीडिया युजरने लिहिले, "तो सैनिक पापणीही लवली नाही, ही मी पाहिलेली सर्वात मोठी शिस्त आहे." "मी माझ्या कामावर कितीही प्रेम करत असलो, तरी इतका मोठा धोका पत्करायला मी तयार नाही, अशी कमेंट दुसऱ्या एका युजरने केली.
काही युजर्सनी मात्र हा धोकादायक प्रकार नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, कॅमेरा अँगलमुळे विमान सैनिकाच्या खूप जवळ वाटत आहे. "हा केवळ परस्पेक्टिव्ह आणि फोकल लेंथचा परिणाम आहे. तो सैनिक विमानापासून किमान २०० मीटर लांब असावा," असे एका युजरने लिहिले.
ट्रम्प यांचा चीन दौरा
हा व्हायरल व्हिडीओ डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन दिवसांच्या महत्त्वपूर्ण चीन दौऱ्यादरम्यानचा आहे. इराण युद्धामुळे मार्चमध्ये होणारा हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. आता या दौऱ्यात ट्रम्प चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करणार असून, दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.
विमानतळावर ट्रम्प यांचे स्वागत चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग आणि 'वेलकम'च्या घोषणा देणाऱ्या गर्दीने केले. ट्रम्प यांच्यासोबत इलॉन मस्क आणि जेन्सन हुआंग यांसारखे दिग्गज टेक लीडर्सही या दौऱ्यावर आहेत. या शिखर परिषदेत टॅरिफ, तंत्रज्ञान स्पर्धा, तैवान आणि इराण संघर्षावर चर्चा होणार आहे.
Is he a robot? 🤖
— Military Observer (@TheMilObserverr) May 13, 2026
A Chinese officer is going viral after standing perfectly still as Air Force One thundered just meters overhead with absolutely no visible reaction.
The internet has questions. pic.twitter.com/hXBDZy5SaD