१ किलो मिठामध्ये किती दाणे असतात? चौघा मित्रांची 'सटकली' आणि मोजून काढले, पाहा किती असतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 13:58 IST2026-04-15T13:50:20+5:302026-04-15T13:58:58+5:30
Salt Interesting Facts : एक किलो मिठाच्या पॅकेटमध्ये मिठाचे बारीक बारीक किती दाणे असतात? कदाचित नक्कीच केला नसेल.

१ किलो मिठामध्ये किती दाणे असतात? चौघा मित्रांची 'सटकली' आणि मोजून काढले, पाहा किती असतात
Salt Interesting Facts : मीठ हा एक असा पदार्थ आहे ज्याच्याशिवाय काही खाण्याचा विचारही कुणाला करवत नाही. कारण मिठाशिवाय काही खाल्लं तर ते बेचव लागेल. हीच मिठाची खासियत आहे. स्वयपाक करताना अनेकजण अंदाजाने भाजी मीठ घालतात, तर जेवणात वरून चिमूटभर किंवा त्यापेक्षा जास्त घेतलं जातं. सामान्यपणे बाजारात गेल्यावर १ किलो मिठाचं एक पॅकेट किंवा दोन विकत घेतले जातात. इतकं मीठ बरेच दिवस पुरतं. मीठ किलोप्रमाणेच घेतलं जातं. पण आपण कधी विचार केलाय का की, एक किलो मिठाच्या पॅकेटमध्ये मिठाचे बारीक बारीक किती दाणे असतात? कदाचित नक्कीच केला नसेल. पण चार मित्रांमध्ये हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि त्यानी चक्क दाणे मोजून काढले.
आता मिठाचे दाणे किती बारीक असतात हे आपल्याला माहीत आहेच. पण तरी सु्द्धा ते मोजण्याची हिंमत चौघांनी दाखवली. पण हे काम त्यांच्यासाठी काही सोपं नव्हतं. आपल्याला विश्वास बसणार नाही की, १ किलो मिठात किती दाणे असतात हे जाणून घेण्यासाठी त्यांना तब्बल ९ दिवसांचा कालावधी लागला. त्यांनी जी आकडेवारी काढली त्यानुसार १०० ग्रॅम मिठामध्ये १३ लाख ७५ हजार दाणे असतात. या हिशोबाने १ किलो मिठामध्ये तब्बल १ कोटी ३७ लाख ५० हजार इतके दाणे असायला हवेत. पण त्यांनी मोजले तेव्हा १ किलो मिठामध्ये १ कोटी ४२ लाख १३ हजार ७५३ दाणे निघाले.
पण हा केवळ अंदाज मानला जाऊ शकतो. कारण एक्सपर्टनुसार, मिठांच्या दाण्यांचा आकार वेगवेगळे असतो. सामान्यपणे टेबल सॉल्टच्या दाण्यांचा आकार ०.३ ते ०.५ मिलीमीटर दरम्यान असतो. जर सरासरी पद्धतीने मोजणी केली तर १ किलो मिठामध्ये साधारण ५ कोटी ते ८ कोटी दाणे असू शकतात. काही लोकांनी ही संख्या ७० लाख ते ८ कोटीपर्यंत सांगितली. मुळात हे ठरतं ते मिठाच्या दाण्यांचा आकार किती छोटा किंवा मोठा आहे.
एका अंदाजानुसार, जर एक दाणा ०.१ मिलीमीटरचा मानला गेला, तर १ किलो मिठात साधारण ८३ कोटी दाणे असू शकतात. पण प्रत्यक्षात मिठाचे दाणे यापेक्षा मोठ्या आकाराचे असतात. त्यामुळे त्यांची संख्या यापेक्षा कमी असते.