आजीबाईंनी लेक्साकडे केली अशी डिमांड की अ‍ॅलेक्साही चक्रावून गेली, नेटकरी बोलले आज्जीबाई भलत्याच डिमांडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 19:42 IST2021-09-23T18:40:36+5:302021-09-23T19:42:26+5:30

गणपती जरी आपल्या गावी गेले असले तरी गणपती बाप्पाचा फिवर काही ओसरताना दिसत नाहीये. याच गणपती बाप्पांसाठी आजीबाईंनी ह्युमन रोबो अलेक्साला जणू वेठीसच धरलंय. आजीबाईंची डिमांड ऐकुन अलेक्साही चक्रावून गेलीय...

grand mother old woman ask Alexa to play Ganpati Bhajan cute video goes viral | आजीबाईंनी लेक्साकडे केली अशी डिमांड की अ‍ॅलेक्साही चक्रावून गेली, नेटकरी बोलले आज्जीबाई भलत्याच डिमांडिंग

आजीबाईंनी लेक्साकडे केली अशी डिमांड की अ‍ॅलेक्साही चक्रावून गेली, नेटकरी बोलले आज्जीबाई भलत्याच डिमांडिंग

गणपती जरी आपल्या गावी गेले असले तरी गणपती बाप्पाचा फिवर काही ओसरताना दिसत नाहीये. याच गणपती बाप्पांसाठी आजीबाईंनी ह्युमन रोबो अ‍ॅलेक्साला जणू वेठीसच धरलंय. आजीबाईंची डिमांड ऐकुन अलेक्साही चक्रावून गेलीय...

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक आजी टीव्हीजवळच्या अ‍ॅलेक्सा युनीटजवळ जाते. आणि तिच्याकडे काहीतरी डिमांड करते. यावेळी कदाचित आजीबाईचा मुलगा तिला डिमांड करण्यात मदत करतो. आजीबाई अ‍ॅलेक्साकडे डिमांड करत म्हणते, अ‍ॅलेक्सा (Alexa) गणपती भजन, गणपती श्लोक बोलो, स्तुती बोलो, आरती बोलो, ओम गण गणपतये नम: बोलो.

सोशल मीडियावर आजीबाईंचा हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडताना दिसतो आहे. लोक यावर अनेक मजेशीर प्रतिक्रीया देत आहे. यातील अनेकजण आजीबाईंना क्युट म्हणत आहेत. बरं यातील असेही अनेक लोक आहेत, जे अ‍ॅलेक्साचं उत्तर काय होतं हे जाणून घ्यायला इच्छुक आहेत. यातील एका युजरने लिहलं अलेक्सा म्हणाली असेल, हा आजीबाई मी तुमच्या सगळ्या डिमांड लिहून घेते.

Web Title: grand mother old woman ask Alexa to play Ganpati Bhajan cute video goes viral