"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 09:20 IST2026-04-17T09:20:20+5:302026-04-17T09:20:50+5:30
अभिनेत्री तिच्या हॉट फोटोशूटमुळे कायम चर्चेत असते, प्रसिद्ध मालिकेत केलंय काम

"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
'बडे अच्छे लगते है' मालिकेत दिसलेली अभिनेत्री चाहत खन्ना वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. चाहतचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे. २००६ साली तिने भरत नरसिंघानीसोबत लग्न केलं होतं. एका वर्षातच तिचा घटस्फोट झाला. नंतर २०१३ साली तिने फरहान मिर्झासोबत निकाह केला. पतीसाठी धर्मही बदलल्याची चर्चा झाली. तिने जुळ्या मुलींना जन्म दिला. नंतर काही वर्षांनी तिने पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला. २०१७ साली त्यांचा घटस्फोट झाला. आता नुकतंच चाहते धर्म बदलल्याच्या चर्चांवर पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे.
चाहत खन्नाने नुकतीच सुभोजित घोषला मुलाखत दिली. यामध्ये तिने वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. ती म्हणाली, "माझ्या बोलण्याचा कायमच चुकीचा अर्थ लावला गेला आहे. आजही जर मी काही विधान केलं तर त्यातलं एक वाक्य काढून चुकीच्या पद्धतीने दाखवलं जाईल. मी सेक्युलर व्यक्ती आहे. मी दिवाळी जितकी उत्साहात साजरी करते तितकीच ईदही करते. मी ईस्लाम धर्म स्वीकारला होता आणि तो माझा वैयक्तिक निर्णय होता. मला बळजबरी धर्मांतर करायला लावलं अशी लोकांनी चर्चा केली. पण मी कधीच असं सांगितलं नव्हतं. माझा ईस्लाम आणि सनातन दोन्हीवर विश्वास आहे आणि मी कोणा एका धर्मापर्यंत सीमित राहत नाही."
ती पुढे म्हणाली,"माझ्या आयुष्यात जे घडलं त्यानंतर मी कायम निराश, उदास असायचे. मला भीती वाटायची. माझ्यासोबत हे काय होतंय असा मला प्रश्न पडायचा. माझं नाव खराब होत होतं. आता मला कामच मिळणार नाही असंही काही लोक म्हणाले. मात्र जसं जसं मला आयुष्य आणि लोक समजायला लागले माझा आत्मविश्वास वाढत गेला आणि या गोष्टी मला अगदीच छोट्या वाटायला लागल्या. एक वेळ अशी होती की मी स्वत: गोंधळलेले होते पण आता मी खूप स्ट्राँग बनली आहे."
याआधी २०२४ साली चाहतने टेली टॉक इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, "मला माझ्या निर्णयाचा पश्चाताप वाटत नाही. घटस्फोटानंतर स्वतःला सावरण्यासाठी मला ४-५ वर्षे लागली. मी निकाहसाठी स्वतःहून धर्म बदलला होता, मला कोणीही तसं करायला भाग पाडलं नव्हतं. पण नंतर मला माझ्या देवाची पूजा न करण्यास सांगण्यात आले. त्यावेळी मी एका हरवलेल्या लहान मुलीसारखी त्या वाटेवर चालत राहिले," अशी खंत तिने व्यक्त केली होती.