गर्लफ्रेन्डने 'त्याचे' चॉकलेट खाऊ नये म्हणून बॉयफ्रेन्डचा कारनामा, हसावं की रडावं कळणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 16:26 IST2019-09-18T16:25:35+5:302019-09-18T16:26:35+5:30

काही लोक असे असतात ज्यांना त्यांच्या कोणत्याही वस्तू कुणाशी शेअर करायच्या नसतात. ना त्यांच्या खाण्याच्या वस्तू ना वापरायच्या...

Fiance buys fridge safe to protect chocolates | गर्लफ्रेन्डने 'त्याचे' चॉकलेट खाऊ नये म्हणून बॉयफ्रेन्डचा कारनामा, हसावं की रडावं कळणार नाही!

गर्लफ्रेन्डने 'त्याचे' चॉकलेट खाऊ नये म्हणून बॉयफ्रेन्डचा कारनामा, हसावं की रडावं कळणार नाही!

(Image Credit : independent.co.uk)

काही लोक असे असतात ज्यांना त्यांच्या कोणत्याही वस्तू कुणाशी शेअर करायच्या नसतात. ना त्यांच्या खाण्याच्या वस्तू ना वापरायच्या...खासकरून चॉकलेटबाबत हे अधिकच बघायला मिळतं. अशाच एकाचा पर्दाफाश स्वत: त्याच्या होणाऱ्या बायकोने केला आहे. डेव विलियम्स असं या व्यक्तीचं नाव असून त्याने असा काही कारनामा केलाय की, हसावं की रडावं कळणार नाही.

यूकेतील स्टेसी लोवे या महिलेने फेसबुकवर एक पोस्ट आणि काही फोटो शेअर केले आहेत. त्यात तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा कारनामा सांगितल आहे. स्टेसीने त्याची आवडती चॉकलेट डेव म्हणजेच तिच्या होणाऱ्या नवऱ्याने एक फ्रीज सेफ खरेदी केला. त्याचे फोटो स्टेसीने शेअर केले आहेत. आणि सांगितले की, डेव सर्व जंक फूड आणि चॉकलेट मी खाऊ नये म्हणून फ्रीजच्या सेफमध्ये ठेवतो. 

स्टेसी होणाऱ्या नवऱ्याच्या या कारनाम्याचा चांगलाच समाचार घेतला. ती म्हणाली की, 'तुम्ही सोबत घर खरेदी करता, मुलं होतात, लग्न ठरतं, लग्नाचं प्लॅनिंग करता आणि घरातील सर्वच गोष्टी करता. आणि डेव फ्रीजचा सेफ घेऊन आलाय. त्याला त्याचे चॉकलेट शेअर करायचे नाहीत, खरंच तो ब्रेक-अप मटेरिअल आहे. हो, ना?'.

Web Title: Fiance buys fridge safe to protect chocolates