employee asked for permission to park horse so that he can come to office on that maharashtra nanded letter goes viral | घोड्यावरून ऑफिसला यायचं ठरवलंय, तो बांधायला परवानगी द्यावी; नांदेडच्या कर्मचाऱ्याचं पत्र व्हायरल

प्रातिनिधीक छायाचित्र

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांनं जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्रघोडा विकत घेण्याचा आपण निर्णय घेतल्याचा कर्मचाऱ्याचा पत्रात उल्लेख

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी कार्यालयं बंद होतं. अत्यावश्यक सेवा सोडल्या तर अनेक जण घरूनच कामही करत होते. परंतु जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला, तसतशी कार्यालयं पुन्हा सुरूही झाली आणि कर्मचारी हळूहळू आपल्या कार्यालयांमध्ये रूजूही होऊ लगाले. दरम्यान, सध्या एक पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात कर्मचाऱ्यानं चक्क कार्यालयात आपण घोड्यावरून येणार असून घोडा उभा करण्यासाठी जागा मिळावी यासाठी कर्मचाऱ्यानं चक्क जिल्हाधिकारी कार्यालयालाच पत्र लिहिलं आहे.

सतीश देशमुख असं या कर्मचाऱ्याचं नाव असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. तसंच सध्या ते सहाय्यक लेखाधिकारी (रोहयो शाखा), जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे कार्यरत आहेत. आपल्याला पाठीचा त्रास होत असल्यामुळे कार्यालयात दुचाकीवरून येण्यास समस्या निर्माण होत असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. 


दुचाकीवरून कार्यालयात येण्यासाठी त्रास होत असल्यानं आपण घोडा विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घोड्यावर बसून विहित वेळेत कार्यालयात येणं आपल्याला शक्य होईल आणि घोडा आणल्यास त्याला कार्यालयीन परिसरात बांधण्यासाठी परवानगी देण्याची विनंतीही त्यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे. त्यांनी ३ मार्च रोजीच हे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला लिहिलं आहे. सध्या त्यांचं हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: employee asked for permission to park horse so that he can come to office on that maharashtra nanded letter goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.