Son Burns Father Office in China : लहान मुलं एकटे घरात असतील किंवा बाहेर असतील तेव्हा काय करतील याचा काहीच नेम नसतो. आता हेच बघा ना...एका १२ वर्षाच्या मुलाची मस्ती त्याच्या वडिलाला इतकी महागात पडली की, त्याचं पूर्ण ऑफिसच जळून राख झालं. व्यक्ती आपल्या मुलाला ऑफिसमध्ये घेऊन गेली होती, पण खेळता खेळता त्याने वडिलांच्या बिझनेसची राखरांगोळी केली. ही नेमकं कसं झालं आणि काय भानगड आहे जाणून घेऊया.
मुलाला ऑफिसमध्ये नेणं पडलं महागात
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, ही घटना चीनच्या जियांग प्रांताच्या निंगबो शहरातील आहे. इथे एक वडील आपल्याला मुलाला ऑफिसमध्ये सोबत घेऊन गेला. मुलासोबत जास्त वेळ घालवता मिळवाला हा यामागचा उद्देश होता. मुलगा काहीना काही खेळत राहिला आणि वडील कामात बिझी झाले. अशात मुलगा एकटा राहिला. वडील काही कामासाठी बाहेर गेले आणि मुलगा एकटा कॅबिनमध्ये बसून होता. सुरूवातीला तर सगळं काही ठिक होतं. पण काही वेळातच असं काही झालं ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल.
मुलाचा कारनामा आणि आगीचा भडका...
आता वडील कामात बिझी झाल्यामुळे मुलगा एकटा पडला होता आणि त्याला कंटाळाही येऊ लागला होता. तो आजूबाजूला ठेवलेल्या वस्तूंसोबत खेळत होता. इतक्यात त्याच्या हाती एक लायटर लागलं आणि तो त्याने टिशू पेपर जाळून टाइमपास करू लागला होता. त्याला कल्पनाही नव्हती की, त्याच्या एका चुकीने मोठी दुर्घटना घडेल. टिशू पेपरची ठिणगी बाजूला असलेल्या वस्तूंवर पडली आणि पाहता पाहता आग पसरली.
काही वेळात आग मोठ्या प्रमाणात पसरली. ऑफिसमधील साहित्य, फर्नीचर सगळं आगीत जळू लागलं. जास्त आग लागल्यावर त्याने मदतीसाठी आवाज दिला. त्यानंतर कर्मचारी आणि काही लोक आग विझवू लागले. अग्निशमन दलाला सूचना दिली गेली. पण ते येईपर्यंत ऑफिसचं बरंच नुकसान झालं होतं.
सुदैवाने कुणाला इजा नाही
दुर्घटना मोठी आणि गंभीर होती. पण सुदैवाची बाब म्हणजे यात कुणाच्याही जीवाला धोका झाला नाही आणि कुणाला इजाही झाली नाही. पण ऑफिसचं बरंच नुकसान झालं. हजारो युआनचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं. फोटोत दिसलं की, भींती काळ्या झाल्या आणि फर्नीचरही जळून राख झालंय.
Web Summary : A 12-year-old boy accidentally set his father's office on fire in China while playing with a lighter. The fire caused significant damage to the office but thankfully, no one was injured. The incident serves as a cautionary tale about children left unsupervised.
Web Summary : चीन में एक 12 वर्षीय लड़के ने लाइटर से खेलते समय गलती से अपने पिता के ऑफिस में आग लगा दी। आग से ऑफिस को काफी नुकसान हुआ, लेकिन सौभाग्य से कोई घायल नहीं हुआ। यह घटना बच्चों को अकेला छोड़ने के खतरे को दर्शाती है।