शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
2
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
3
Top Marathi News Live: विजय यांची बहुमत जुळवण्यासाठी धडपड, आणखी एका पक्षाला पाठवले पत्र
4
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
5
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
6
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
7
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
8
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
9
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
10
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
11
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
12
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
13
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
14
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
15
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
16
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
17
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
18
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
19
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
20
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
Daily Top 2Weekly Top 5

अचानक बोगद्यात बंद पडली मेट्रो, लाईटही गेली; प्रवाशांनी मोबाईलचा टॉर्च लावून गाठलं पुढचं स्टेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 10:15 IST

Chennai Metro Viral Video: मंगळवारी सकाळी चेन्नई मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एका अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला.

Chennai Metro Stuck Video: मंगळवारी सकाळी चेन्नईमेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एका अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. विन्को नगर डेपोकडे जाणारी ब्लू लाईन मेट्रो ट्रेन ही सेंट्रल मेट्रो आणि हायकोर्ट स्टेशनदरम्यान असलेल्या एका बोगद्यात अचानक बंद पडली, ज्यामुळे प्रवाशांना अंधारातून पायी चालत पुढील स्टेशन गाठावे लागले.सकाळच्या गर्दीच्या वेळी ही घटना घडली. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रो ट्रेन बोगद्यात अडकली आणि ट्रेन थांबताच डब्यांमधील वीजपुरवठाही खंडित झाला. यामुळे प्रवाशांना संपूर्ण अंधारात अडकावे लागले. सुमारे १० मिनिटे अडकल्यानंतर, मेट्रो अधिकाऱ्यांकडून प्रवाशांना घोषणा ऐकू आली की, त्यांना हायकोर्ट स्टेशनवर चालत जावे लागेल.

अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी असलेल्या मार्गावरून पायी चालण्यास सुरुवात केली. त्यांनी बोगद्याच्या आत मार्गावर रांग लावली आणि हायकोर्ट स्टेशनवर पोहोचण्यासाठी सुमारे ५०० मीटर चालत गेले. यावेळी, बोगद्यातील आपत्कालीन दिवे आणि मेट्रो कर्मचाऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. प्रवाशांनी अंधारात मार्ग काढण्यासाठी मोबाईलच्या टॉर्चचा वापर केल्याचेही सांगण्यात येत आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी ही गैरसोय झाल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी नाराजी होती. अचानक वीज खंडित झाल्यामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उद्भवली असावी, असे मानले जात आहे.

घटनेनंतर काही वेळातच चेन्नई मेट्रोने ट्विटरवर पोस्ट करून सेवा पूर्ववत झाल्याची माहिती दिली. त्यांनी विमानतळ ते विन्को नगर डेपोपर्यंत ब्लू लाईनवरील आणि सेंट्रल मेट्रो ते सेंट थॉमस माउंटपर्यंत ग्रीन लाईनवरील सेवा सामान्य झाल्याचे स्पष्ट केले. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत, असे म्हणत मेट्रो प्रशासनाने प्रवाशांची माफी मागितली.

English
हिंदी सारांश
Web Title : Chennai Metro halted in tunnel; passengers walk to next station.

Web Summary : Chennai Metro's blue line stalled in a tunnel due to a technical glitch. Passengers walked 500 meters in darkness to the High Court station, using phone flashlights. Service resumed; officials apologized for the inconvenience.
टॅग्स :Metroमेट्रोViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरलChennaiचेन्नई