शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत विद्यार्थिनीने शिक्षिकेवर उगारला हात, शिवीगाळ करत फेकून दिला फोन; नक्की काय घडले? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 14:09 IST

School Teacher Slapped By Student : गैरवर्तनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शाळा प्रशासनानेही कारवाईचा बडगा उगारला.

कोरोना व्हायरसचा कहर कमी झाल्याने जगभरात अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत. मुलं शाळेत जायला लागली आहेत, मात्र काही ठिकाणी अशा घटना ऐकायला मिळत आहेत, ज्या ऐकून तुम्हाला धक्का बसेल. अमेरिकेतील टेक्सासमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका विद्यार्थिनीने आपल्या वर्ग शिक्षिकेवर हात उगारला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याप्रकरणी शाळा प्रशासनानेही कारवाई करण्याचे म्हटले आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, टेक्सासमधील एका शाळेत विद्यार्थिनीने रागाच्या भरात वर्ग शिक्षिकेला मारहाण केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, संतापलेली विद्यार्थिनी तिच्या जागेवरून उठते आणि तिच्या आईला फोन करण्यासाठी शिक्षिकेच्या डेस्कवर जाते. शिक्षिकेने तसे करण्यास नकार दिल्याने तिने थेट शिक्षिकेवर हात उगारला. यानंतर शिक्षिकेने तिला वर्गाबाहेर जाण्यास सांगितले, मात्र संतप्त विद्यार्थिनीने ऐकले नाही.

विद्यार्थिनीने आपल्या आईला फोन करून शिक्षिकेवर 'वांशिक' टिप्पणी केली. एवढेच नाही तर शेवटी संतापलेल्या विद्यार्थिनीने शिक्षिकेवर फोन फेकला आणि वर्गाच्या बाहेर गेली. यावेळी शिक्षिका अतिशय शांत वर्तनात दिसून आल्या. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ वर्गातील एका विद्यार्थ्याने रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले.

गैरवर्तनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शाळा प्रशासनानेही कारवाईचा बडगा उगारला. शाळा प्रशासनाने एका निवेदनात म्हटले आहे की, 'आम्ही शिक्षिकाच्या शांत वागण्याचे कौतुक करतो. आम्ही संपूर्ण घटनेत शिक्षिका आणि त्यांच्या प्रतिक्रियेचे जोरदार समर्थन करतो. शिक्षिकेविरुद्ध होणारा छळ, वर्णद्वेष आणि हिंसा सहन करणार नाही. याप्रकरणी शाळा प्रशासनाकडून संपूर्ण चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAmericaअमेरिकाStudentविद्यार्थीTeacherशिक्षकSchoolशाळा