'या' फोटोत बिबट्या शोधून शोधून लोक झाले हैराण...पाहा तुम्हाला सापडतोय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 12:02 IST2019-09-30T11:59:34+5:302019-09-30T12:02:05+5:30

एक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा फोटो प्रचंड शेअर होत असून या फोटोने भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. 

Can you spot the leopard in this photo photo goes viral | 'या' फोटोत बिबट्या शोधून शोधून लोक झाले हैराण...पाहा तुम्हाला सापडतोय का?

'या' फोटोत बिबट्या शोधून शोधून लोक झाले हैराण...पाहा तुम्हाला सापडतोय का?

सध्याचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे. असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. कारण या इंटरनेटच्या जगात कधी आणि काय व्हायरल होईल याचा काहीही नेम नसतो. कधी काही व्हायरल गोष्टींनी मन व्याकूळ होतं, तर कधी प्रचंड राग येतो. अनेकदा तर व्हायरल होणाऱ्या या गोष्टी विचार करायला भाग पाडतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा फोटो प्रचंड शेअर होत असून या फोटोने भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. 

Bella Lack नावाच्या एका ट्विटर यूजरने हा फोटो शेअर केला तेव्हापासून या फोटोचीच चर्चा सोशल मीडियावर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. फोटो शेअर करताना या ट्विटर यूजरने लिहिलं आहे की, 'एका व्यक्तीने मला हा फोटो पाठवला आणि मला सांगितलं की, या फोटोमध्ये एक बिबट्या आहे, त्याला शोधून दाखव. जोपर्यंत मला बिबट्या या फोटोमध्ये दिसला नाही. तोपर्यंत मी हा जोक समजत राहिलो. तुम्ही शोधू शकाल का?'

सापडला का? 

ट्विटरवर ट्रेंड होणारा हा फोटो अनेकांच्या डोकेदुखीचं कारण ठरला. अनेकांना या फोटोमध्ये बिबट्या शोधणं फार कठिण जात आहे. करावं तर काय करावं अन् जावं तर कुठे जावं? अशीच काहीशी परिस्थिती नेटकऱ्यांची झाली आहे. 

अरेच्चा... यांना तर सहज सापडला.... 

काय सांगता तुम्हाला अजून सापडला नाही का? टेन्शन नका घेऊ. बिबट्याबबात अनेकदा असं सांगितलं जातं की, त्याचा स्वभाव थोडासा लाजाळू असतो. तसेच तो फार चाणाक्षही असतो. त्यामुळे तो सहजा सहजी कोणच्या नजरेस पडत नाही. 

Web Title: Can you spot the leopard in this photo photo goes viral